दरोडाप्रकरणातील आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:30 IST2021-03-10T04:30:29+5:302021-03-10T04:30:29+5:30
हिंगोली शहराजवळील सुराणानगरात ७ मार्च रोजी एसआरपीएफ जवान आर.व्ही. त्रिमुखे यांच्या घरी सशस्त्र दरोडा पडला. तब्बल १२ ते १३ ...

दरोडाप्रकरणातील आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
हिंगोली शहराजवळील सुराणानगरात ७ मार्च रोजी एसआरपीएफ जवान आर.व्ही. त्रिमुखे यांच्या घरी सशस्त्र दरोडा पडला. तब्बल १२ ते १३ दरोडेखोरांनी या भागात प्रवेश करून तलवारीचा धाक दाखवून सोन्या-चांदीच्या दागिण्यासह सव्वा दोन लाख रूपयांचा ऐवज लांबविला होता. या घटनेमुळे या भागातील नागरीकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेनंतर पोलिसांनी चहुबाजूंनी तपास सुरू केला. त्यांच्या तपासाला यश येत असून एका ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात यातील काही दरोडेखोर कैद झाले आहेत. तीन ते चार दरोडेखोर त्रिमुखे यांच्या घरासमोरून जात असून यातील एकजण गेटजवळून घरातील व्यक्तींचा अंदाज घेत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने तपास सुरू केला असून या घटनेतील दरोडेखोर लवकरच अटक होतील, असा आशावाद हिंगोली ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.आर. बंदखडके यांनी व्यक्त केला.
फोटो