वाशिम जिल्ह्यात अपघात; सेनगावचे दोन युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 23:50 IST2018-05-26T23:50:23+5:302018-05-26T23:50:23+5:30

तालुक्यातील आजेगाव व गुगूळपिंपरी येथील मावसभाऊ असलेले दोन युवक २५ मे रात्री १० च्या सुमारास वाशिम-रिसोड रस्त्यावर लाखाळा पाटी येथे झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

Accidents in Washim district; Two youths of Sengawak killed |  वाशिम जिल्ह्यात अपघात; सेनगावचे दोन युवक ठार

 वाशिम जिल्ह्यात अपघात; सेनगावचे दोन युवक ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : तालुक्यातील आजेगाव व गुगूळपिंपरी येथील मावसभाऊ असलेले दोन युवक २५ मे रात्री १० च्या सुमारास वाशिम-रिसोड रस्त्यावर लाखाळा पाटी येथे झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
तालुक्यातील आजेगाव येथील कल्पक दत्तराव डोळस (१९) हा त्यांच्या तालुक्यातील गुगूळपिंपरी येथील हर्षल धौत्रे (१७) याला सोबत घेवून एम.एच. ३८.८१४४ या मोटारसायकलने शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास जात होता. लाखाळा पाटी येथे पवन मंगल कार्यालयासमोर भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला उडविले. या अपघातात दोघांना अत्यंत गंभीर मारल्याने त्यांना वाशिम येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु तोपर्यंत त्या दोघांचा मृत्यू झाला होता.
कल्पक डोळस हा वाशिम येथील अग्निशमन दलात कार्यरत होता. मागील पंधरवड्यात त्याच्या बहिणीचा साखरपुडा त्याच्या पुढाकाराने झाला तर हर्षल याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. या दोन मावस भावाच्या अपघाती मृत्यूने तालुक्यातील आजेगाव, गुगूळपिंपरी या दोन्ही गावांत शोककळा पसरली आहे.
दोघांच्या मृतदेहावर शनिवारी आप-आपल्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. परिसरातील मोठा जनसमुदाय अंत्यसंस्कारांस उपस्थित होता.

Web Title: Accidents in Washim district; Two youths of Sengawak killed