ए.बी.एम. इंग्लिश हायस्कूलमध्ये जिल्हास्तरीय गणित प्रश्नमंजूषा स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:27 IST2021-02-14T04:27:52+5:302021-02-14T04:27:52+5:30

विद्यार्थ्यांमध्ये गणिती संकल्पना रुजावी, तसेच गणित संज्ञा स्पष्ट होऊन विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड निर्माण व्हावी यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन ...

A.B.M. District Level Mathematics Quiz Competition in English High School | ए.बी.एम. इंग्लिश हायस्कूलमध्ये जिल्हास्तरीय गणित प्रश्नमंजूषा स्पर्धा

ए.बी.एम. इंग्लिश हायस्कूलमध्ये जिल्हास्तरीय गणित प्रश्नमंजूषा स्पर्धा

विद्यार्थ्यांमध्ये गणिती संकल्पना रुजावी, तसेच गणित संज्ञा स्पष्ट होऊन विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड निर्माण व्हावी यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, शिक्षणाधिकारी परसराम पावसे, आदर्श महाविद्यालयाचे गणित विभागप्रमुख श्रीराम खटोड, एबीएम समूह अध्यक्ष दिलीप बांगर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कोविड-१९ च्या नियमावलीनुसार सोशल डिस्टन्सिंग पालन करीत हे प्रदर्शन घेतले जाणार आहे. यासाठी प्रत्येकाची गेटवर प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. संशयास्पद लक्षणे आढळल्यास विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारण्यात येईल. या प्रदर्शनामध्ये मॉडेल मेकिंग व गणिती प्रश्नमंजूषा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मॉडेल मेकिंग ही स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी अशा दोन गटांत घेण्यात येणार आहे. गणिती प्रश्नमंजूषा स्पर्धा इयत्ता पाचवी ते दहावी अशा एकाच गटात घेतली जाणार आहे. प्रत्येक शाळेमधून प्रत्येक स्पर्धेसाठी दोन विद्यार्थी स्पर्धक म्हणून सहभाग घेऊ शकतील, तसेच प्रश्नमंजूषा स्पर्धा ही इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली राहणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसांसह प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक १५ फेब्रुवारीपर्यंत http://www.abmenglishschool.com या शाळेच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी व सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्राचार्य जोसेफ के.जे., प्राचार्य अनुरितेश, अनिता अनांदन, गणित शिक्षक जेपा सुजीन, कविता कुलकर्णी, शेख रहीम, शेख उजमा यांनी केले आहे.

Web Title: A.B.M. District Level Mathematics Quiz Competition in English High School