अबब...गाव इवलेसे अन् सरपंचपदासाठी अर्ज दाखल झाले १८
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 19:29 IST2022-12-02T19:29:03+5:302022-12-02T19:29:24+5:30
औंढा तालुक्यातील सात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी २२ तर सदस्य पदासाठी १०४ अर्ज दाखल

अबब...गाव इवलेसे अन् सरपंचपदासाठी अर्ज दाखल झाले १८
औंढा नागनाथ (हिंगोली ): तालुक्यात होत असलेल्या सात ग्रामपंचायतच्या निवडणुका अनुषंगाने नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी २२ तर सदस्य पदासाठी १०४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले. विशेष म्हणजे, शिरड शहापूर गावातून सरपंचपदासाठी शेवटच्या दिवशी १० उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले. आता गावातून एकूण १७ जण सरपंचपदासाठी इच्छुक असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आज शेवटच्या दिवशी तालुक्यातील रामेश्वर सरपंच पदासाठी ३ तर सदस्य पदासाठी१७, उंडेगाव सरपंच पदासाठी ३ तर सदस्य पदासाठी २१, शिरड शहापूर सरपंच पदासाठी १० तर सदस्य पदासाठी २५, गोजेगाव सरपंच पदासाठी २ तर सदस्य पदासाठी१३, सारंगवाडी सरपंच पदासाठी ३ तर सदस्य पदासाठी १५, उखळी सरपंच सदस्य पदासाठी यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने शेवटच्या दिवशी हे गाव निरंक राहिले तर मुर्तीजापुर सावंगी सरपंच पदासाठी १ तर सदस्य पदासाठी १३ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले.
आता ५ डिसेंबर रोजी छाननी तर ७ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, जनतेतून सरपंच निवड असल्याने सर्वच पॅनल प्रमुखांनी आता निवडणुकीसाठी कंबर कसल्याचे चित्र आहे.