कोरोनाचे नवे ९ रुग्ण; ३ रुग्ण बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:27 IST2021-01-18T04:27:42+5:302021-01-18T04:27:42+5:30

रविवारी आरटीपीसीआर टेस्टद्वारे ९ रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये एकूण १२ जणांची ...

9 new corona patients; 3 patients healed | कोरोनाचे नवे ९ रुग्ण; ३ रुग्ण बरे

कोरोनाचे नवे ९ रुग्ण; ३ रुग्ण बरे

रविवारी आरटीपीसीआर टेस्टद्वारे ९ रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये एकूण १२ जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एकही रुग्ण बाधित आढळून आला नाही.

आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आलेल्या रुग्णांमध्ये हिंगोली परिसर ३, सेनगाव परिसर ५, औंढा नागनाथ परिसर १ असे आहेत. रविवारी ३ रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत कोरोनाचे एकूण ३,६४० रुग्ण झाले आहेत. यापैकी ३,५०७ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजघडीला एकूण ७८ रुग्णांवर उपचार चालू आहेत. आजपर्यंत एकूण ५५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑयसोलेशन वॉर्ड जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे भरती असलेल्या रुग्णांपैकी ४ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन चालू आहे. एका कोरोना रुग्णाची प्रकृती अति गंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे.

Web Title: 9 new corona patients; 3 patients healed