शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

ग्रामीण अतिक्रमणांची ८५ प्रकरणे फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:52 IST

प्रशासनाने ग्रामीण भागातील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी काढलेल्या आदेशानंतर ग्रामपंचायतींकडून आॅनलाईन प्रस्ताव पाठविण्यात आले होते. यात १२ हजार ५६७ पैकी १२ हजार ४८२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तर ८५ प्रस्ताव फेटाळले आहेत.

ठळक मुद्दे७३१८ प्रकरणे तपासलीगावठाणमध्ये ५00 चौ. फुटांपेक्षा कमीची १७४0 अतिक्रमणे

हिंगोली : प्रशासनाने ग्रामीण भागातील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी काढलेल्या आदेशानंतर ग्रामपंचायतींकडून आॅनलाईन प्रस्ताव पाठविण्यात आले होते. यात १२ हजार ५६७ पैकी १२ हजार ४८२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तर ८५ प्रस्ताव फेटाळले आहेत.२0१८-१९ या आर्थिक वर्षात अतिक्रमणे नियमित करण्यासाठी शासनाने जिल्हा परिषदांना सुचित करून थेट ग्रामपंचायतींमार्फत आॅनलाईन माहिती मागविली होती. यात वसमत तालुक्यातून ३२८७, हिंगोली -२६७६, कळमनुरी-२0७७, सेनगाव-३५७८ तर औंढ्यातून ९४९ प्रस्ताव आले होते. यापैकी औंढा ५, वसमत-१४, हिंगोली ४५, कळमनुरी ११ तर सेनगावचे १0 असे ८५ प्रस्ताव फेटाळले आहेत.मंजुरी देण्यात आलेल्यांपैकी ८४६१ प्रकरणे तपासणीसाठी देण्यात आले होते. यापैकी ७३१८ तपासले. त्यात ७२२५ मध्ये भरलेली माहिती योग्य असल्याचे आढळले. तर ८१ प्रकरणांत चुकीची माहिती होती. शिवाय १२ प्रकरणांतील मालमत्ताच सापडली नाही. मग ही नोंदणी झाली तरी कशी, हा प्रश्न आहे. यात औंढ्यात ५, हिंगोलीत ४ तर उर्वरित तीन तालुक्यांत प्रत्येकी एक प्रकरण आहे. तर ११४३ प्रकरणांत अजून तपासणीच झाली नाही. यात औंढ्यात २४, वसमत ३७0, हिंगोली १२७, कळमनुरी ११५, सेनगाव ५0७ अशी संख्या आहे. अनेक गावांत अतिक्रमणे नियमित न केल्यामुळे घरकुलांसह इतर अनेक बाबींसाठी अडचणी येत आहेत. त्या अडचणी या अतिक्रमण नियमित केल्यानंतर दूर होणार आहेत. अनेक ठिकाणी गावठाणमध्ये अतिक्रमण करून राहणारे गोरगरीब आहेत. तर काही ठिकाणी बड्यांचे अतिक्रमणही नियमित करण्याचे प्रस्ताव यामध्ये गेले आहेत. मात्र ज्यांना घरकुलापासून वंचित राहावे लागत आहे, अशांचे प्रस्ताव तरी छाननी करून शासनाने मंजूर करणे गरजेचे आहे. बऱ्याचदा या मंडळीचे नाव यादीत येते. मात्र जागेअभावी ते काम करू शकत नाहीत. पं.दीनदयाल उपाध्याय योजनेत पन्नास हजारांपर्यंतची रक्कम अनुदान मिळणार आहे. मात्र शासकीय दर तेवढा होत नसल्याची अडचणही येत आहे.

  • सात महिन्यांपूर्वी याबाबतचा आदेश शासनाने काढला होता. त्यानंतर अतिक्रमणांविषयी माहिती आॅनलाईन करण्यात आली होती. ही माहिती आॅनलाईनच मंजूर करण्याची प्रक्रियाही पार पडली. मात्र तपासणी व इतर बाबींमध्ये अजूनही यावर अंतिम निर्णय झालेला नाही. तो झाल्यानंतरच या अतिक्रमणधारकांचा लाभ होणार आहे.

५०० चौ. फुटापेक्षा कमीची गावठाण अतिक्रमणेतालुका मंजूर प्रस्ताव तपासलेले योग्य त्रुटीत प्रलंबितऔंढा १५४ ९२ ८९ ८४ ५वसमत ६0१ ४४७ ३६0 ३५५ २हिंगोली २९२ १२८ १0८ १0६ २कळमनुरी १५७ ११२ ८0 ८0 0सेनगाव ५३६ २३४ २१६ २१२ 0या प्रकारातही वसमत व सेनगावात प्रत्येकी चार मालमत्ता सापडत नसल्याचे समोर आलेले आहे. त्यामुळे काही ठिकाणी केवळ अपलोडिंगचे काम झाले असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीEnchroachmentअतिक्रमणHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद