६० हजारांचा गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:03 IST2018-03-12T00:02:57+5:302018-03-12T00:03:02+5:30

जिंतुरमार्गे वसमतकडे येणाºया गुटख्याची माहिती कुरूंदा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पाठलाग करून जीप पकडली. यात ६० हजार रूपये किंमतीच्या गुटख्याचे १० पोते पोलिसांनी ११ मार्च रोजी जप्त केले.

 60 thousand gutkha caught | ६० हजारांचा गुटखा पकडला

६० हजारांचा गुटखा पकडला

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूंदा : जिंतुरमार्गे वसमतकडे येणा-या गुटख्याची माहिती कुरूंदा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पाठलाग करून जीप पकडली. यात ६० हजार रूपये किंमतीच्या गुटख्याचे १० पोते पोलिसांनी ११ मार्च रोजी जप्त केले. कुरूंदा परिसरात सर्रासपणे छुप्या पद्धतीने गुटखा विक्री होत असून गिरगाव तर चक्क गुटख्याचे मुख्य केंद्र बनले आहे. या ठिकाणी विक्रीसाठी वाहनांतून गुटखा उतरविला जातो. जीप क्रमांक एमएच-२६- एएफ-२२७४ या वाहनांतून वसमत-औंढा मार्गे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच हिरडगाव पाटीपासून सपोनि शंकर वाघमोडे व पथकाने पाठलागक करून गुटखा घेऊन जाणारी जीप पकडली. परंतु जीपचालक मात्र पसार झाला. पोलिसांनी वाहन जप्त केले.

Web Title:  60 thousand gutkha caught