कोरोनाचे नव्याने ४९ रुग्ण, २८ जण बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:54 IST2021-03-13T04:54:41+5:302021-03-13T04:54:41+5:30
आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात वैजापूर १, रिसाला बाजार १, शिवाजीनगर २, कोमटी गल्ली १, सराफा बाजार १, जुने पोलीस ...

कोरोनाचे नव्याने ४९ रुग्ण, २८ जण बरे
आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात वैजापूर १, रिसाला बाजार १, शिवाजीनगर २, कोमटी गल्ली १, सराफा बाजार १, जुने पोलीस ठाणे १, अमला १, विद्यानगर १, लाला लजपतराय नगर १, डिग्रसवाणी १, मस्तानशहानगर १, बोरजा १ असे १४ बाधित आढळले. वसमत परिसरात पाटीलनगर २, वसमत २ असे ४ बाधित आढळले. सेनगाव परिसरात गोरेगाव ९ तर भानखेडा १ असे दहा जण तर कळमनुरी परिसरात जुने पोलीस ठाणे ३, माळेगाव १, तांबोळी गल्ली १, शस्त्रीनगर२ असे सात जण बाधित आढळून आले.
आज बरे झालेल्यांमध्ये कमलानगर५, नारायणनगर १, जिल्हा रुग्णालय १, कळमनुरी १, शिवाजीनगर ३, भोईपुरा १, औंढा १, रामाकृष्णानगर १, सावकरनगर १, मारवाडी गल्ली १, ३ संदर्भित केलेले यांना जिल्हा रुग्णालयातून सोडण्यात आले. लिंबाळा येथून मंगळवारा १, आकोट १, चारठाणा१, चका १ अशा चौघांना घरी सोडले. औंढा ना. येथून औंढा १, जवळा बजार १, सावंगी १ अशा तिघांना घरी सोडले. तर कळमनुरीतून दोघांना घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत कोरोनाचे एकूण ४६४५ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४१४९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तरएकूण ४३१ जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत ६५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या दाखल असलेल्यांपैकी २२ जण ऑक्सीजनवर असून ३ अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे.