तलावासाठी ४.७० दलघमी पाणी उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:27 IST2018-11-30T00:27:40+5:302018-11-30T00:27:56+5:30
सेनगाव तालुक्यातील सुकळी येथील प्रस्तावित साठवण तलावासाठी नाशिक येथील जलविज्ञान केंद्राकडून ४.७० दलघमी पाणी उपलब्ध केल्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे.

तलावासाठी ४.७० दलघमी पाणी उपलब्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील सुकळी येथील प्रस्तावित साठवण तलावासाठी नाशिक येथील जलविज्ञान केंद्राकडून ४.७० दलघमी पाणी उपलब्ध केल्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे.
नाशिक येथील जलविज्ञान केंद्राचे मुख्य अभियंता डी.आर. जोशी यांचे पत्र क्र. गोदावरी, कयाधू, ८३१ नुसार २९ नोव्हेंबर रोजी सदर पाणी उपलब्धता प्रमाणात दिले आहे. त्यामुळे सुकळी येथील साठवण तलाव होणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सिंचन अनुषेश दुर करण्याच्या भाग म्हणून सदर तलाव प्रस्तावित केला आहे. आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या सतत पाठपुराव्यामुळे या प्रकल्पास पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. लवकरच कामास मंजुरी मिळेल व सुकळी परिसरातील सिंचनक्षेत्रात वाढ होईल, अशी अपेक्षा आ. मुटकुळे यांनी व्यक्त केली. सिंचन अनुशेषात एकेक काम मंजूर होत आहे.