जिल्ह्यात कोरोनाचे ४४ नवे बाधित; १९ जण बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:30 IST2021-03-10T04:30:31+5:302021-03-10T04:30:31+5:30
आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात २१ रुग्ण आढळले. यात एकांबा १, रिसाला बाजार १, पेन्शनपुरा २, जिजामातानगर २, विवेकानंदनगर १, ...

जिल्ह्यात कोरोनाचे ४४ नवे बाधित; १९ जण बरे
आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात २१ रुग्ण आढळले. यात एकांबा १, रिसाला बाजार १, पेन्शनपुरा २, जिजामातानगर २, विवेकानंदनगर १, एनटीसी ४, छत्रपतीनगर १, आनंदनगर १, आरके कॉलनी १, पोस्ट ऑफिस रोड ४, शास्त्रीनगर १, बांगरनगर १, जिजामातानगर १ यांचा समावेश आहे. औंढा १, वसमत तालुक्यातील बोराळा १, तर कळमनुरी तालुक्यातील सांडस १, विद्यानगर ४, देवळा २ यांचा समावेश आहे. आज हिंगोली येथील आयसोलेशन वाॅर्डातून बरे झालेल्या १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये डिग्रस कऱ्हाळे १, अंतुलेनगर १, सेनगाव १, शाहूनगर २, गोरेगाव ३, कलगाव १, जिल्हा रुग्णालय १, अकोला बायपास १, शिवाजीनगर १, गंगनगर ३, हिलटॉप कॉलनी २ तर एका संदर्भित रुग्णाचा समावेश आहे. कळमनुरीतूनही एकास डिस्चार्ज दिला.
आजपर्यंत कोरोनाचे एकूण ४४८१ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०३३ जण बरे झाल्याने घरी सोडले, तर ३८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ६४ जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झला आहे. सध्या दाखल असलेल्यांपैकी २२ रुग्ण ऑक्सिजनवर, तर ३ बायपॅपवर आहेत.