जवळा बाजार येथे ग्रामपंचायत निवडणुकीत १६ जागांसाठी ४३ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:38 IST2021-01-08T05:38:06+5:302021-01-08T05:38:06+5:30
जवळा बाजार या परिसरातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून, यामध्ये प्रभाग ६ मधून १७ सदस्य निवडले जातात. मात्र, प्रभाग ...

जवळा बाजार येथे ग्रामपंचायत निवडणुकीत १६ जागांसाठी ४३ उमेदवार रिंगणात
जवळा बाजार या परिसरातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून, यामध्ये प्रभाग ६ मधून १७ सदस्य निवडले जातात. मात्र, प्रभाग ६ मधील ओबीसी प्रवर्गातून हरिश्चंद्र अंभोरे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे ते बिनविरोध निवडून आले आहेत. आता एकूण ६ प्रभागांमधून १६ जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी यांची महाआघाडी झाली आहे. याविरुद्ध माजी समाजकल्याण सभापती मुनीर पटेल यांचा एकता पॅनल लढत असून, अकरा अपक्ष उमेदवारही मैदानात उतरले आहेत. त्यामुळे याठिकाणी अटीतटीची लढत होत आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांची महाआघाडी निर्माण झाली असून, माजी समाजकल्याण सभापती मुनीर पटेल यांच्या एकता पॅनलसह ११ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यापूर्वी या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे आता एकता पॅनल तयार केले आहे. तर महाआघाडीमध्ये शिवसेनेचे ११, भाजपचे ३ आणि राष्ट्रवादीचे ३ असे मिळून १७ उमेदवार आहेत. महाआघाडीचे नाजीमाबी शाबास पठाण व साबेर कुरेशी तर एकता पॅनलचे माजी सरपंच फैसल पटेल, सिमा शफी कुरेशी निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे १६ जागांसाठी ४३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. दोन पॅनलच्या अटीतटीच्या लढतीत ११ अपक्ष उमेदवारांची भूमिकाही महत्त्वाची आहे.