अरुंद पुलामुळे ३ वाहने एकमेकांवर धडकली; एक ठार, तिघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 19:03 IST2021-12-01T19:03:08+5:302021-12-01T19:03:33+5:30
बाराशीव कारखान्याकडे जाणारा उसाचा ट्रक व दोन दुचाकीत विचित्र अपघात

अरुंद पुलामुळे ३ वाहने एकमेकांवर धडकली; एक ठार, तिघे जखमी
जवळा बाजार ( हिंगोली ) : येथून जवळ असलेल्या सतरा मैल परिसरातील पूर्णा कालव्याच्या पूलावर १ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास दोन मोटरसायकल व एक ट्रॅक्टर या तिन्ही वाहनांचा विचित्र अपघात होऊन, एकजण ठार तर तिघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
नागेशवाडी ते झिरो फाटा दरम्यान रस्त्याचे नवीन काम झाले आहे. मात्र या रस्त्यावर जवळा बाजार येथील पूर्णा पाटबंधारे विभागाच्या कालव्यावरील पूल जुनाच असून हा पूल अरुंद आहे. त्यामुळे या पूलावरून वाहतुक करणे नेहमीच धोकादायक ठरते आहे. बाराशीव कारखान्याकडे जाणारा उसाचा ट्रक व जवळा बाजारकडून हट्ट्याकडे जाणारी एक दुचाकी व बाराशिवहून जवळा बाजार जाणारी एक दुचाकी यांच्यात अपघात झाला.
यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. जखमीमध्ये राहूल दिलीप भुजंगळे वय २० रा. लाख ता. औढा याला परभणी येथे उपचारासाठी नेले असता मृत्यू झाला आहे. पंडीत गोविंदराव कदम रा. करंजाळा ता. वसमत हा गंभीर जखमी असून इतर दोघे जखमी असून त्यांना उपचारासाठी परभणी येथे दाखल केले आहे. हा अपघात अरुंद पुलावर झाल्याने या रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक खाेंळबली हाेती.