शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'पूर्णा' कारखान्याच्या निकालाकडे ३ जिल्ह्यांचे लक्ष; २१ जागांसाठी ४८ उमेदवारांचा निकाल उद्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 13:11 IST

पूर्णा साखर कारखान्यावर पुन्हा दांडेगावकर यांचे वर्चस्व राहणार की परीवर्तन होणार ? या निकालाकडे नांदेड, परभणी व हिंगोली या जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.

- इस्माईल जाहगीरदारवसमत (हिंगोली): पूर्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी रविवारी ८०.५६ टक्के मतदान झाले. यानंतर मंगळवारी सकाळी आठ वाजता शहरातील जुने तहसिल कार्यालय परिसरात असलेल्या धान्य गोडाऊन मध्ये मतमोजणीस सुरुवात होणार आहे. निवडणुकीत दोन्ही पॅनल मध्ये अटीतटीचा  सामना पहावयास मिळाला. पूर्णा साखर कारखान्यावर पुन्हा दांडेगावकर यांचे वर्चस्व राहणार की परीवर्तन होणार ? या निकालाकडे नांदेड, परभणी व हिंगोली या जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे. टोकाई निवडणुकीत ऊस गाळपास नेला जात नाही, हा मुद्दा गाजला होता‌. पूर्णा कारखान्याचे निवडणुकीतही काही प्रमाणात का होईना उसाचा मुद्दा गाजलेला पाहायला मिळाला.

वसमत येथील पूर्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी ९ जुलै रोजी मतदान झाले. निवडणुकीत माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर व आमदार राजू नवघरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल तर त्यांचे प्रतिस्पर्धी उज्वला तांभाळे व डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास परीवर्तन पॅनल तसेच कॉंग्रेस नेते अ. हफीज अ. रहेमान यांनी ६ अपक्ष उमेदवार यांना एकत्रित करून तिसरे पॅनल निवडणुकीत उभे केले होते. २१ जागांसाठी ४८ उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले आहेत. रविवारी सकाळी ८ ते ४ वाजेदरम्यान २१ हजार ५२० मतदारांपैकी १७ हजार ३३६ मतदार यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी कमी होणार असे चित्र असताना दुपारपासून मतदानाचा आकडा वाढला. शेवटी ८०.५६ टक्के मतदान झाले. 

मतदान प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी विकास देशमुख, तहसीलदार शारदा दळवी, किशोर धुतमल, अनिल पाटील यांची नजर होती. एकूण ४४१ कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया पूर्ण केली. मतदानाच्या पेट्या जुने तहसील परिसरातील धान्य गोडाऊन येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्या.११ जुलै रोजी सकाळी ८ वाजेदरम्यान मतमोजणीस सुरुवात होणार आहे. मतदान मोजणी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालणार असल्याचे संकेत आहेत.

प्रचार आरोप प्रत्यारोपाने निवडणूक गाजली...पूर्णा निवडणुकीत बाराशिव कारखान्यासह हक्काचा कारखाना ऊस गाळपास नेत नसल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. ऊस उत्पादक शेतकरी सभासद मतदार यांनी उमेदवारां समोर ऊस गाळपास नेल्या जात नसल्याचे प्रश्न पोटतिडकीने मांडला.

मतमोजणी केंद्रावर तगडा पोलीस बंदोबस्त.....११ जुलै रोजी सकाळी ८ वा शहरातील जुने तहसिल परिसरात असलेल्या धान्य गोडाऊनमध्ये मतमोजणी केंद्रावर मतमोजणीस सुरुवात होणार आहे. त्यासाठी मतमोजणी केंद्रावरील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपविभागीय पोलिस अधिकारी संदिपान शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि चंद्रशेखर कदम यांच्या सह सपोनि पांडुरंग बोधणापोड, फौजदार राहुल महीपाळे यांच्यासह आदिंनी बंदोबस्त तैनात केला आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी