भरदिवसा ३ लाखांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 23:32 IST2018-06-07T23:32:41+5:302018-06-07T23:32:41+5:30
शहरातील बांगरनगर येथे गुरूवारी दुपारी १२.३० ते १ च्या सुमारास चोरट्यांनी घर फोडून कपाटातील दहा तोळे सोने व दहा हजारांची रोकड असा ऐवज लंपास केला. .

भरदिवसा ३ लाखांची चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील बांगरनगर येथे गुरूवारी दुपारी १२.३० ते १ च्या सुमारास चोरट्यांनी घर फोडून कपाटातील दहा तोळे सोने व दहा हजारांची रोकड असा ऐवज लंपास केला. .
गजबजलेल्या ठिकाणी बांगरनगर आहे. परंतु या वस्तीतच भरदिवसा चोरी झाली. सूर्यकांत परसराम बांगर यांच्या घरी ही चोरी झाली. मुलाच्या अॅडमिशनसाठी ते घराबाहेर पडले होते. परंतु घरी परत येताच त्यांना कुलूप तोडलेले दिसले. आतमध्ये लोखंडी कपाट उघडे व सामान अस्ताव्यस्त फेकून दिल्याचे दिसून आले. चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत कुलूप तोडून सोने व रोकड लंपास केली. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता. लवकरच गुन्हा दाखल करून घेतला जाईल असे पोनि चंदेल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.