हिंगोलीतल्या वसमतमध्ये अनेक गावांत जाणवला भूकंपाचा धक्का; नागरिक भयभीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 23:57 IST2021-09-10T23:54:54+5:302021-09-10T23:57:32+5:30
भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल

हिंगोलीतल्या वसमतमध्ये अनेक गावांत जाणवला भूकंपाचा धक्का; नागरिक भयभीत
कुरुंदा: वसमत तालुक्यातील पांगारा शिंदे येथे सव्वा दहा ते साडे दहाच्या दरम्यान भूकंपाचा धक्का जाणवला आहे. त्याशिवाय इतर गावामध्येदेखील याचवेळी धक्का जाणवला आहे. भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता ३.३ रिश्टर स्केलइतकी होती. सतत बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत झाला आहे.
पांगारा शिंदे येथे दोन वर्षापासून सतत भूकंपाचा धक्का व गुढ आवाज येण्याचा प्रकार नित्याचा बनला आहे. दिवसागणिक या भूकंपाची व्याप्ती वाढत आहे. वसमत तालुक्यातील अनेक गावांना त्याचा धक्का जाणवू लागल्याने भीतीचे वातावरण आहे. पांगारा शिंदे, शिरळी, वापटी, कुपटी, राजवाडी, खांबाळा, त्याशिवाय कुरुंदा व परिसरातदेखील भूकंपाचा धक्का जाणवला आहे.
इतर गावांना शुक्रवारी रात्री 10:22 ला भूकंपाचा धक्का जाणवल्याचे समजते.अत्यन्त मोठा भूकंपाचा धक्का असल्याने घरातील भांडे व पलंग हल्ल्याचे अनेकांना जाणवले तर ग्रामीण भागात नागरिक देखील घराबाहेर आले होते एका प्रकारे सतत होणाऱ्या भूकंप व गूढ आवाजाची भीती निर्माण झाली आहे, वसमत तालुक्यातील पांगारा शिंदे हे भूकंपाचे केंद्रस्थान बनलेले आहेत. भूकंपाचे कारणे व त्यावर संशोधन होणे गरजेचे असून जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते.