२६ नवीन शिक्षकांना पदस्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 11:59 PM2019-09-13T23:59:25+5:302019-09-13T23:59:46+5:30

पवित्र पोर्टलवरून हिंगोली जिल्ह्यासाठी मिळालेल्या एकूण २४ शिक्षकांसह आंतरजिल्हा बदलीने आलेल्या २ शिक्षकांना समुपदेशन पद्धत राबवून पदस्थापना देण्यात आली आहे. समुपदेशन केल्याच्या दिवशीच पदस्थापना दिल्याने शिक्षकांतून आनंद व्यक्त होत आहे.

 २६ The appointment of new teachers | २६ नवीन शिक्षकांना पदस्थापना

२६ नवीन शिक्षकांना पदस्थापना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : पवित्र पोर्टलवरून हिंगोली जिल्ह्यासाठी मिळालेल्या एकूण २४ शिक्षकांसह आंतरजिल्हा बदलीने आलेल्या २ शिक्षकांना समुपदेशन पद्धत राबवून पदस्थापना देण्यात आली आहे. समुपदेशन केल्याच्या दिवशीच पदस्थापना दिल्याने शिक्षकांतून आनंद व्यक्त होत आहे.
हिंगोली जिल्ह्यात शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे अनेक शाळांतून शिक्षक मिळण्यासाठी ओरड होत होती. पालक शाळा बंद करण्याचा निर्णयही घेत असल्याचे अनेक ठिकाणी दिसत होते. आता संचमान्यतेनुसार पवित्र पोर्टलवर ३३ जागा भरण्याची मागणी शिक्षण विभागाने केले होते. यापैकी २८ जणांना नियुक्तीसाठी जि.प.कडे पाठविले होते. कागदपत्रे छाननीसाठी बोलावल्यानंतर २४ जणच हजर झाले होते. या २४ जणांना समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्याची प्रक्रिया अनंत चतुर्दशीच्या दिवशी सीईओ एच.पी.तुम्मोड, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या २ शिक्षकांनाही पदस्थापना दिली आहे. त्याचबरोबर संवर्ग ५ व ६ मध्ये जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये रॅण्डम राउंडमध्ये गेलेल्या शिक्षकांसाठीही समुपदेशन प्रक्रिया राबविली. अशा एकूण ३९ शिक्षकांना पदस्थापना दिली आहे. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया राबवून त्याच दिवशी या शिक्षकांच्या हाती पदस्थापनाही देण्यात आली. अवर सचिव त्रि.शं.कांबळे यांच्या पत्रानुसार ही प्रक्रिया राबविल्याचे सांगितले जाते. पवित्र पोर्टलवरून दाखल नवीन शिक्षकांत २२ शिक्षक सहावी ते आठवीला गणित व विज्ञान विषयासाठी उपलब्ध झाले आहेत. उर्वरित प्राथमिक शिक्षक आहेत.

Web Title:  २६ The appointment of new teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.