वाई शिवारात २५ हजारांचा दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:17 IST2021-01-13T05:17:56+5:302021-01-13T05:17:56+5:30

औंढा - वसमत या मुख्य राज्य रस्त्यावरील वाई शिवारात अवैध दारू विक्री जोमाने सुरू आहे. या गुप्त माहितीवरून वाई ...

25,000 liquor stocks confiscated in Wai Shivara | वाई शिवारात २५ हजारांचा दारूसाठा जप्त

वाई शिवारात २५ हजारांचा दारूसाठा जप्त

औंढा - वसमत या मुख्य राज्य रस्त्यावरील वाई शिवारात अवैध दारू विक्री जोमाने सुरू आहे. या गुप्त माहितीवरून वाई शिवारात एका ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून १० बॉक्स दारू किंमत २४ हजार ९६० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ११ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आली. वाई शिवारातील श्याम गिराजी कदम यांच्या शेताजवळ बाबुराव बन्सी श्रावणी (रा. वापटी) हा गेल्या कित्येक दिवसांपासून देशी दारूची खुलेआम विक्री करत आहे. सपोनि सुनील गोपीनाथ पवार यांच्या पथकाने साेमवारी रात्रीच्या सुमारास छापा टाकला असता, त्यांच्याजवळ देशी दारूचे १० बॉक्स आढळून आले. याप्रकरणी कुरूंदा पोलीस स्थानक येथे गुन्हा दाखल करण्यात आला. फौजदार सविता बोधनकर, बालाजी जोगदंड, संतोष पटवे आदींनी कारवाई केली.

फाेटाे नं. ०१

Web Title: 25,000 liquor stocks confiscated in Wai Shivara