शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

२४ बालकांना काढले कुपोषणातून बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:08 IST

महिला व बालकलयाण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या २५१ ग्राम बालविकास केंद्रात दाखल ४४४ तीव्र कुपोषितांपैकी २२३ बालकाचे वजन वाढले आहे. तर २४ बालके कुपोषणातून बाहेर पडली आहेत. जवळपास एक महिन्यात बालकांमध्ये ही सुधारणा झाली आहे. जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. मागील अनेक दिवसांपासून लोकप्रतिनिधी कुपोषणाच्या मुद्यावर प्रशासनाला धारेवर धरत होते. हा भाग आदिवासीबहुल व मागास आहे. ग्रामीण भागात परिस्थिती अतिशय बिकट आहे. अनेक मुलांना योग्य पोषण आहार व आरोग्य सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महिला व बालकलयाण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या २५१ ग्राम बालविकास केंद्रात दाखल ४४४ तीव्र कुपोषितांपैकी २२३ बालकाचे वजन वाढले आहे. तर २४ बालके कुपोषणातून बाहेर पडली आहेत. जवळपास एक महिन्यात बालकांमध्ये ही सुधारणा झाली आहे.जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. मागील अनेक दिवसांपासून लोकप्रतिनिधी कुपोषणाच्या मुद्यावर प्रशासनाला धारेवर धरत होते. हा भाग आदिवासीबहुल व मागास आहे. ग्रामीण भागात परिस्थिती अतिशय बिकट आहे. अनेक मुलांना योग्य पोषण आहार व आरोग्य सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे.या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभागामार्फत बाल ग्रामविकास केंद्र सुरू करण्याचा निर्णय झाला होता. यासाठी १0८९ अंगणवाड्यांमधून सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये ४४४ बालके कुपोषित आढळली होती.त्यांना बालकविकास केंद्रात दाखल करण्यात आले. जिल्ह्यातील सहा प्रकल्पांअंतर्गत बालविकास केंद्रात दाखल प्रकल्पनिहाय मुले हिंगोली -६१, वसमत १३४, कळमनुरी २३, आखाडा बाळापूर २६, औंढा नागनाथ १०९, सेनगाव ९१ असे चित्र आहे. या बालकांना दिवसातून आठवेळा पोषण आहार व आरोग्य सेवा दिली जात आहे. यापैकी २४ बालकांना कुपोषणाबाहेर काढण्यात यश आले आहे. यामध्ये हिंगोली-४, वसमत-१५, औंढा-३ व सेनगाव २ अशी प्रकल्पनिहाय संख्या आहे. कळमनुरी व औंढ्यात अजून एकही बालक कुपोषणाबाहेर आले नाही.२२३ बालके कमी कुपोषित गटात आली आहेत. यामध्ये हिंगोली-२५, वसमत-७५, कळमनुरी-१४, आखाडा बाळापूर-९, औंढा नागनाथ-६0 व सेनगावातील ४0 बालके आहेत.एका महिन्यात श्रेणीवर्धनाचे आव्हानबालविकास केंद्र आणखी महिनाभर सुरू राहणार आहेत. या काळात सर्वच बालके सर्वसाधारण श्रेणीमध्ये आणण्याचे आव्हान आगंणवाडीताई, मदतनीस, पर्यवेक्षिकांना पेलावे लागणार आहे. ही बालके कुपोषणाबाहेर आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी दिल्या.या बालविकास केंद्रांमध्ये तीव्र कुपोषित बालकाला पूरक पोषण आहार दिला जातो.या आहारमध्ये दूध,केळी, अंडी असे पोषण आहार दिले जाते. त्याच बरोबर वेगवेगळया लसीकरण सुध्दा दिल्या जाते. तसेच यादरम्यान त्याला आरोग्यविषयक समस्या असल्यास त्यावर उपचारही केले जातात.त्यामुळे या केंद्रामध्ये कुपोषित बालकांचे श्रेणीवर्धन होण्यास मदत होते. तर बालकांना घरीही योग्य प्रकारचा आहार मिळण्यासाठी त्यांच्या पालकांना जागरुक केले जात आहे. ही बालके पुन्हा कुपोषणाच्या गर्तेत सापडू नये, याची काळजी घेतली जात आहे.या उपक्रमावर जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जि.प. सीईओ एच.पी.तुम्मोड, महिला व बालकल्याणच्या सभापती रेणूका जाधव लक्ष ठेवून आहेत. यातील काहींनी केंद्रांना भेटीही दिल्या.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealthआरोग्य