शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

२१७ प्राथमिक शिक्षकांचे समायोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 11:58 PM

प्राथमिकच्या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया जि.प.च्या षटकोनी सभागृहात दुपारी सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत मराठीचे २१७ तर उर्दूच्या ९ शिक्षकांचे समायोजन झाले. यात मनासारखे ठिकाण न मिळाल्याने नाराजांचीच संख्या मोठी दिसत होती.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : प्राथमिकच्या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया जि.प.च्या षटकोनी सभागृहात दुपारी सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत मराठीचे २१७ तर उर्दूच्या ९ शिक्षकांचे समायोजन झाले. यात मनासारखे ठिकाण न मिळाल्याने नाराजांचीच संख्या मोठी दिसत होती.हिंगोली जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेल्या प्राथमिकच्या शिक्षकांची संख्या २१८ एवढी आहे. या शिक्षकांना २३२ रिक्त जागांवर संधी होती. यासाठीची समुपदेशन प्रक्रिया जि.प.च्या सभागृहात घेतली. यासाठी अतिरिक्त मुकाअ पी.व्ही. बनसोडे, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के आदींची उपस्थिती होती. सायंकाळी सात वाजेपर्यंत ही प्रक्रिया आटोपली नव्हती. अनेकांना यात गाव निवडण्याची संधी असली तरीही मनासारखे गाव सापडत नव्हते. विशेष म्हणजे महिलांना तर यात कोणते गाव घ्यावे, हेच समजत नसल्याने मोठी गोची होत असल्याचे चित्र होते. रिक्त पदांची संख्या सेनगाव तालुक्यात जास्त असल्याने शेवटच्या टप्प्यातील अनेकांना नाईलाजाने याच तालुक्यात जावे लागत होते. विशेष म्हणजे महिलांना यातील जवळचे व दूरचे गाव कोणते हे कळत नसल्याने ऐनवेळी फसगतच सोसावी लागली.वसमतला अतिरिक्त शिक्षक ६७ तर रिक्त जागा २५, औंढ्यात अतिरिक्त शिक्षक ३६ तर रिक्त जागा ५९, कळमनुरीत अतिरिक्त शिक्षक ५१ तर रिक्त जागा ३८, सेनगावात अतिरिक्त शिक्षक २९ तर रिक्त जागा ७२, हिंगोलीत अतिरिक्त शिक्षक ३५ तर रिक्त जागा २९ होत्या.माध्यमिकचे करून दाखवा!ज्या पद्धतीने प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी प्रशासन पुढाकार घेत आहे. तसा माध्यमिकसाठी ओढा का नाही. एकेका शाळेवर गणित, इंग्रजीचे दोन शिक्षक तर दुसरीकडे एकही नाही. त्यामुळे ग्रामीण शाळा बंद पडत असताना प्रशासन केवळ कागदी खेळ खेळत आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही प्रक्रियाही हाती घ्यावी. शिक्षण विभागाचा संचमान्यता मिळत नसल्याचा बनवाबनवीचा खेळ थांबवावा, अशी अपेक्षा काही जि.प. पदाधिकाºयांनी व्यक्त केली. आता भविष्यात हा मुद्दा काय रंग घेतो, हे कळणारच आहे.शिक्षकांच्या समुपदेशन पद्धतीची घाई जि.प.प्रशासनाने केल्याने पदाधिकारी मात्र नाराज झाले. जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे, उपाध्यक्ष अनिल पतंगे, सभापती संजय देशमुख, प्रल्हाद राखोंडे हे सगळेच हजर असतानाही प्रक्रियेकडे फिरकले नाही. विशेष म्हणजे अध्यक्षांनी या प्रक्रियेसंबंधित कागदपत्रांची मागणी करून ही प्रक्रिया लांबणीवर टाकण्यासाठी पत्र दिले होते. मात्र त्यालाही कोणताच प्रतिसाद दिला नाही. उलट सीईओच भ्रमणध्वनी बंद करून बसल्याचा आरोप केला जात होता. यामुळे या प्रक्रियेचे गाºहाणे घेवून येणाºयांना मजेशिररीत्या हे सगळे सांगितले जात होते. तर प्रक्रिया कायदेशीर झाली की नाही? याचाही अंदाज घेतला जात आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदTeacherशिक्षक