१९४१२ कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 00:54 IST2018-09-11T00:54:24+5:302018-09-11T00:54:49+5:30
जिल्हा आरोग्य विभागातर्फे मागील तीन वर्षांत १९४१२ कुटुंबनियोजन शस्त्रक्रीया करण्यात आल्या आहेत. मात्र यामध्ये पुरूषनसबंदीला अल्प प्रतिसाद मिळत आहेत. मागील तीन वर्षात केवळ १७२ पुरूषांनी नसबंदी करून घेतली आहे.

१९४१२ कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा आरोग्य विभागातर्फे मागील तीन वर्षांत १९४१२ कुटुंबनियोजन शस्त्रक्रीया करण्यात आल्या आहेत. मात्र यामध्ये पुरूषनसबंदीला अल्प प्रतिसाद मिळत आहेत. मागील तीन वर्षात केवळ १७२ पुरूषांनी नसबंदी करून घेतली आहे.
कुटुंब नियोजनासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. ‘छोटे कुटुंब सुखी कुटुंब’ असा नारा देत कुटुंबनियोजनाचे महत्त्व समाजामध्ये बिंबवले जात आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेमध्ये मात्र पुरष नसबंदीचे अल्प प्रमाण आहे. त्यामुळे कुटुंबनियोजनाची जबाबदारी महिलांनीच घेतली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सन २०१५-१६ मध्ये जिल्हा आरोग्य विभागाला कुटुंबनियोजनासाठी ७ हजार ६६८ उदिष्ट दिले होते, त्यापैकी ६ हजार ७८६ कुटुंबनियोजनच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून यामध्ये ५७ पुरूषांनी नसबंदी केली आहे. तसेच २०१६-१७ या वर्षात ८ हजार ५०७ उदिष्ट होते. त्यापैकी ६ हजार ७८१ जणांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करून घेतली, यात सर्वाधिक ९२ पुरूषांनी नसबंदी करून घेतली. तर सन २०१७-१७८ या वर्षात आरोग्य खात्याला ८ हजार ५०७ कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेचे उदिष्टापैकी ५ हजार ८४५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये अत्यल्प म्हणजे केवळ २२ पुरूषांचा सामावेश आहे. तर चालू आर्थिक वर्षाची आकडेवारी जुळवणी आरोग्य विभागामार्फत सुरू आहे.
आतापर्यंत ४४३ जणांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करून घेतली असून एकही पुरूष नसबंदी केसची नोंद आरोग्य विभागात दिसून आली नाही. त्यामुळे कुटुंब नियोजनाची जबाबदारी महिलांनीच घेतली आहे, असे वरील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शिवाय जनजागृतीचाही हवा तसा परिणाम दिसून येत नाही. शहरासह ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेने मोहिम राबवून जनजागृती करणे गरजेचे आहे.