पोहण्यासाठी तलावात गेलेल्या १८ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 17:11 IST2017-10-01T17:10:56+5:302017-10-01T17:11:21+5:30

हरिहर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका १८ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी ११.३० वाजता घडली.

An 18-year-old teenager drowned in a swimming pool, drowning | पोहण्यासाठी तलावात गेलेल्या १८ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू 

पोहण्यासाठी तलावात गेलेल्या १८ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू 

औंढा नागनाथ ( हिंगोली ), दि. १  : हरिहर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका १८ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी ११.३० वाजता घडली. अर्जून विलास शिंदे असे मृत युवकाचे नाव असून तो औंढा नागनाथ येथील वासुदेवगल्ली येथील रहिवासी आहे.  

या बाबत प्राथमिक माहिती अशी कि, शहरातील हरिहर तलावात आज सकाळी दुर्गादेवीचे विसर्जनाचा कार्यक्रम सुरू होता. याच दरम्यान, अर्जून शिंदे हा युवक  मित्रांसोबत तलावात पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना अर्जुनला पाण्याचा अंदाज न आल्याने तो तलावाच्या पाण्यात बुडाला. याचवेळी देवी विसर्जनासाठी आलेल्या काही युवकांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी तात्काळ पाण्यात उड्या मारून त्याचा शोध घेतला. काही वेळानंतर अर्जुन तलावाच्या काठावर असलेल्या देवी मंदिराजवळ दिसून आला. 

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानी अर्जुनला ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. 

Web Title: An 18-year-old teenager drowned in a swimming pool, drowning