जिल्ह्यात काेराेनाचे नव्याने १० रुग्ण, १२ जण बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST2021-02-05T07:53:57+5:302021-02-05T07:53:57+5:30

हिंगोली, वसमत, कळमनुरी परिसरातील १६५ जणांची रॅपिड अँटिजन तपासणी २५ जानेवारी राेजी केली. त्यापैकी हिंगोली परिसरात ३ कोरोनाबाधित रुग्ण ...

10 new patients of Kareena in the district, 12 cured | जिल्ह्यात काेराेनाचे नव्याने १० रुग्ण, १२ जण बरे

जिल्ह्यात काेराेनाचे नव्याने १० रुग्ण, १२ जण बरे

हिंगोली, वसमत, कळमनुरी परिसरातील १६५ जणांची रॅपिड अँटिजन तपासणी २५ जानेवारी राेजी केली. त्यापैकी हिंगोली परिसरात ३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच हिंगोली व कळमनुरी परिसरात घेण्यात आलेल्या आरटीपीसीआरमध्ये एकूण ७ रुग्ण आढळून आले. यामध्ये हिंगोली ६ तर कळमनुरी परिसरातील एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच २५ जानेवारी रोजी १२ रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

हिंगोली येथील आयसोलेशन वाॅर्डात ३, औंढा कोरोना केअर सेंटर १, लिंबाळा येथील कोरोना केअर सेंटरमधील ८ कोरोनामुक्त रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ३ हजार ७१४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी ३ हजार ५६९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत ५६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील ४ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आराेग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आली आहे.

Web Title: 10 new patients of Kareena in the district, 12 cured