१० कोटींच्या रस्त्यांना तरीही मुहूर्त नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:30 AM2021-01-23T04:30:13+5:302021-01-23T04:30:13+5:30

हिंगोली : नगरपालिकेच्या हद्दीत न.प.कडून काम सुरू असल्यास त्यात नगरसेवकांचा हस्तक्षेप होतो म्हणून दहा कोटींची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ...

10 crore roads still have no moment | १० कोटींच्या रस्त्यांना तरीही मुहूर्त नाही

१० कोटींच्या रस्त्यांना तरीही मुहूर्त नाही

Next

हिंगोली : नगरपालिकेच्या हद्दीत न.प.कडून काम सुरू असल्यास त्यात नगरसेवकांचा हस्तक्षेप होतो म्हणून दहा कोटींची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत होती. मात्र, ती कामेही सुरू होत नसून येथेही हा हस्तक्षेपच कारण ठरत असल्याचे दिसून येत आहे.

हिंगोली येथे १० कोटींच्या ठोक अनुदानातून रस्त्यांची कामे मंजूर झाल्याचे दोन वेगवेगळे आदेश गतवर्षी मिळाले होते. त्यात २० कोटींची कामे होणार होती. मात्र, हा निधी परत गेला. त्यापैकी १० कोटी रुपयांचा निधी पुन्हा प्राप्त झाला आहे. त्याच्या निविदा झाल्यानंतर कार्यारंभ आदेश देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टाळाटाळ केली जात होती. मात्र, आ.तान्हाजी मुटकुळे यांनी याबाबत आदेशित केल्यानंतर संबंधित कंत्राटदारांना ते आदेश देण्यात आले आहेत, तरीही आता ही कामे सुरू झाली नाहीत. यामागे आता वेगळेच कारण समोर येत असून, हा मुद्दा चर्चेत आला आहे. ही कामे करण्यासाठी काही नगरसेवक समर्थकांचा दबाव येत असल्याने ही कामे त्यांनाच करायचा अट्टाहास चालू आहे.

आ.तान्हाजी मुटकुळे यांनी वारंवार नगरसेवकांनी कामे केली, तर त्यांचा दर्जा काय असतो, असा सवाल उपस्थित केला होता. त्यामुळेच त्यांनी ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर, सगळी प्रक्रिया बांधकाम विभागाकडून राबविण्यात आल्यानंतरही आता पुन्हा तोच प्रकार घडणार असेल, तर मग काय करायचे? हा प्रश्नच आहे.

पुन्हाही निधी परत जाणार

यंदाही मार्च एण्ड जवळ येत आहे. जर ही कामे आता झाली नाही, तर बांधकाम विभागाला तो निधी परत करावा लागणार आहे. नगरपालिकेला निधी खर्च करण्यासाठी दोन वर्षांची मुदत असते. मात्र, बांधकाम विभागाला तर तीही संधी नसते. त्यामुळे आता या वादावर कसा पडदा पडणार? हा प्रश्नच आहे. आता बांधकाम विभागात जरी नगरसेवकांचे काही चालत नसले, तरीही कंत्राटदारांवर मात्र दबाव आणला जात आहे. त्यात यंदाही ही कामे होणार की निधी परत जाणार हा प्रश्न पडला आहे. यात कोणी हस्तक्षेपही करायला तयार नसून, उद्या नाहक तक्रारींच्या भीतीने कंत्राटदारही कामे सुरू करीत नाहीत.

Web Title: 10 crore roads still have no moment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.