शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या मेंदूतही आहे डिलीट बटण, काढून फेका जुन्या आठवणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 14:19 IST

सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, त्या आठवणींपासून सुटका कशी मिळवावी ज्या आठवणींनी आपलं जीवन एका जागेवर बांधून ठेवलं आहे. विज्ञान असं सांगतं की, यांचं उत्तर आहे. 

(Image Credit : news.stanford.edu)

अनेकदा आपण कितीही प्रयत्न करा पण काही गोष्टी आपल्या डोक्यातून कधीच निघत नाहीत. जसे म्हटले जाते की, तुम्ही एखाद्याला माफ करु शकता पण विसरु शकत नाही. पण तुम्ही जर पुन्हा पुन्हा त्याच त्याच जुन्या आठवणी काढत राहिलात तर मेंदूसाठी नवीन आठवणी तयार करणे कठीण होईल. पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, त्या आठवणींपासून सुटका कशी मिळवावी ज्या आठवणींनी आपलं जीवन एका जागेवर बांधून ठेवलं आहे. विज्ञान असं सांगतं की, याचं उत्तर आहे. 

आपणा सर्वांना हे माहीत आहे की, सराव केल्याने माणूस परफेक्ट होतो. मग ते क्रिकेट असो वा एखादं वाद्य वाजवणं असो किंवा डान्स शिकणं असो. तुम्ही एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करता तेव्हा ती गोष्ट आपण चांगल्याप्रकारे करु शकतो.  हीच गोष्ट जुन्या आठवणी काढण्यावर लागू होतात. जर तुम्ही एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा आठवता तेव्हा ती गोष्टी आपल्या डोक्यात आणखी आतपर्यंत जाते आणि नंतर ती गोष्ट डिलिट करणे फार कठीण होतं. 

मग काय करायचं?

तुम्ही कल्पना करा की, तुमचा मेंदू एखाद्या भाजीची बाग आहे. यात टोमॅटो, बटाटे, कांदे आणि इतरही भाज्या आणि फळांचं उत्पादन होतं. फरक केवळ इतका असेल की,  मेंदूमध्ये भाज्यांच्या जागी न्यूरॉन्समध्ये सिनेप्टिक कनेक्शन निर्माण होत आहेत. याच कनेक्शनच्या माध्यमातून गोष्टी मेंदूपर्यंत पोहोचतात. 

ज्याप्रमाणे तुम्हाला तुमची बाग सुंदर ठेवण्यासाठी झाडे कापावी लागतात, तसंच मेंदूसोबत करावं लागतं. मेंदूमध्ये हे काटछाट करण्याचं काम ग्लियाल पेशी करतात. या तुमच्या सिस्टममधून खराब किंवा कडवट आठवणी काढून टाकतात आणि मेंदूच्या एखाद्या कोपऱ्यात फेकून देतात. 

या पेशी सक्रिय कशा करायच्या?

पुरेशी झोप घ्या

जेव्हा तुम्ही पुरेशी झोप घेत नाही तेव्हा डोक जड वाटतं. मेंदू स्टॅंडबाय मोडवर जातो. आणि जास्तीत जास्त प्रत्येक प्रकारच्या आठवणी एकत्र करणे सुरु करतो. पुरेशी झोप न घेतल्याने लक्ष केंद्रीत करण्याची क्षमताही प्रभावित होते. उदाहरणार्थ ऑफिसमध्ये तुमचं कुणाशी भांडण झालं असेल आणि एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करायचं असेल तर तुमचा मेंदू प्रोटेक्टला सोडून तुमच्या भांडणाबाबत विचार करायला लागतो. 

पण जर तुम्ही आराम केला जर तुमच्यातील ग्लियाल सेल्स चांगल्या आणि वाईट आठवणीत फरक करु शकेल आणि खराब आठवणी सिस्टिममधून काढू शकेल. इतकेच नाही तर तुमचा मेंदूची पूर्णपणे क्लीनिंग प्रोसेसही होते. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा मेंदूतील पेशी जवळपास ६० टक्के आकुंचन पावतात. जेणेकरुन ग्लियाल पेशींसाठी स्पेस निर्माण व्हावा.

स्वत:ला बिझी ठेवणे आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. दिवसातून साधारण ६ ते ७ तास काम केल्यानंतर मेंदू इतका थकतो की, त्याला जास्तीच्या गोष्टींबाबत विचार करायला शक्ती नसते. काम करणे आणि स्वत:ला व्यस्त ठेवल्याने तुमच्या मेंदूला नवीन आठवणी तयार करण्यास मदत मिळते आणि याने जुन्या आठवणी नष्ट होतात.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य