भावाशी वाद झाल्याने युवकाने घेतले विष

By Admin | Updated: April 18, 2016 00:47 IST2016-04-18T00:47:05+5:302016-04-18T00:47:05+5:30

जळगाव : किरकोळ कारणावरुन भावाशी वाद झाल्याने तेजस सतीश चौधरी (१७, रा. आचेगाव, ता. भुसावळ) या युवकाने रागाच्या भरात विष प्राशन केले. ही घटना रविवारी दुपारी आचेगाव येथे घडली. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

The young man poisoned due to his brother's argument | भावाशी वाद झाल्याने युवकाने घेतले विष

भावाशी वाद झाल्याने युवकाने घेतले विष

गाव : किरकोळ कारणावरुन भावाशी वाद झाल्याने तेजस सतीश चौधरी (१७, रा. आचेगाव, ता. भुसावळ) या युवकाने रागाच्या भरात विष प्राशन केले. ही घटना रविवारी दुपारी आचेगाव येथे घडली. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
तेजस चौधरी हा भुसावळ येथे आयटीआयचे शिक्षण घेत असून शिक्षणाचा खर्च निघावा म्हणून तो घरी जाताना पेप्सीचे पाकीट नेऊन त्याची विक्री करतो. मात्र वेळ मिळणार नाही म्हणून त्याने भावाजवळ ६० रुपये देऊन पेप्सी आणून ठेवण्याचे सांगितले. मात्र त्याच्या भावाला शेतीच्या कामामुळे वेळ मिळाला नाही व पेप्सी आणल्या गेल्या नाही. त्यात त्यामधील १० रुपये खर्चही झाले. घरी गेल्यावर पेप्सीची विचारणा केली असता त्या न आणल्याचे समजल्यावर तेजसने पैसे परत मागितले. मात्र १० रुपये कमी असल्याने दोघ भावांमध्ये वाद झाला व मोठ्या भावाने त्याला चापट मारली. त्यावेळी रागाने तो गुरांच्या गोठ्याकडे पळाला व तेथेच त्याने विष प्राशन केले.
तशाच अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. येथे त्याच्यावर उपचार करण्यात आले असून प्रकृती स्थिर आहे.

Web Title: The young man poisoned due to his brother's argument