शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

केवळ आंबेच नाहीतर आंब्याच्या पानांनी आरोग्याला मिळतात 'हे' फायदे, तुम्हालाही नसेल माहीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 12:30 IST

Mango leaves health benefits : आज आम्ही तुम्हाला आंब्याच्या पानांचे आरोग्याला होणारे फायदे सांगणार आहोत, जे तुम्हालाही माहीत नसतील.

Mango leaves health benefits : उन्हाळा सुरू झाला की, फळांचा राजा आपल्या वेगवेगळ्या प्रजातींमुळे जगभरात चर्चेत असतो. आंबा आंबट-गोड असण्यासोबतच आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. आंबे तर सगळेच खातात, पण अनेकांना माहीत नसतं की, आंब्याच्या झाडाची पानेही खूप फायदेशीर असतात. वैज्ञानिक भाषेत आंब्याच्या पानांना मॅंगीफेरा इंडिका नावाने ओळखलं जातं. आज आम्ही तुम्हाला आंब्याच्या पानांचे आरोग्याला होणारे फायदे सांगणार आहोत, जे तुम्हालाही माहीत नसतील.

आंब्याच्या पानातील पोषक तत्व

1) आंब्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी सारखे पोषक तत्व असतात. त्याशिवाय यात स्टेरॉयड, एल्कलॉइड्स, राइबोफ्लेविन, थियामिन, फेनोलिक, बीटा-कॅरोटीन, फ्लेवोनोइड्स इत्यादीही तत्व असतात. तसेच यात टेरपेनोइड्स आणि पॉलीफेनोल्सही असतं. यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो आणि शरीरातील सूज कमी होते.

2) आंब्याची पाने त्वचेवरील सुरकुत्या, डाग आणि कोरडेपणा कमी करू शकतात. याने त्वचेमध्ये कोलेजन वाढण्यास मदत मिळते. ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या आणि डाग दूर होतात.

3) आंब्याच्या पानांमध्ये इम्यूनिटी वाढवण्याची शक्ती असते. ज्यामुळे बॅक्टेरियामुळे होणाऱ्या त्वचेच्या इन्फेक्शन आणि जळजळीपासून सुटका मिळते.

4) आंब्याच्या पानांमध्ये डायबिटीसच्या रूग्णांमध्ये ब्लड शुगर लेव्हल  संतुलित करण्याचे तत्व असतात. या पानांमध्ये एंथोसायनिडिन नावाचं टॅनिन असतं. जे डायबिटीसच्या सुरूवातीच्या उपचारात मदत करतं.

पानांच्या वापराची पद्धत

1) तुम्ही 10 ते 15 आंब्याची पाने एक कप पाण्यात उकडून घ्या. हे पाणी रात्रभर थंड होऊ द्या आणि सकाळी गाळून रिकाम्या पोटी याचं सेवन करा.

2) आंब्याच्या पानांचं पावडर पित्त आणि किडनी स्टोनच्या उपचारात वापरलं जातं. किडनी स्टोन तोडण्यासाठी आणि लघवीच्या माध्यमातून बाहेर काढण्यासाठी ही पाने मदत करतात. 

काही आंब्याची पाने घ्या आणि ते वाळत घाला. यापासून पावडर तयार करा आणि पाण्यात मिक्स करा. पाणी रात्रभर तसंच ठेवा आणि सकाळी गाळून पिऊन घ्या.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य