योगा : यशस्वी जीवनाचा मार्ग !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2017 18:28 IST2017-05-26T12:58:59+5:302017-05-26T18:28:59+5:30
सर्व समस्यांपासून सुटका मिळण्यासाठी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी योगा सर्वात उपयुक्त असून हा मार्ग ज्यांनीही अंगिकारला त्याचे आयुष्य सफल झाले आहे.
.jpg)
योगा : यशस्वी जीवनाचा मार्ग !
सध्याच्या स्पर्धेच्या जगात प्रत्येकाला धावपळ करावी लागत आहे. या धावपळीत वेळेअभावी फास्टफु ड, पिझ्झा, बर्गर, बेकरी पदार्थ आदींकडे वळतो. यामुळे खाण्याच्या सवयी बिघडून अपचन, मळमळ, गॅसेस, लठ्ठपणा अशा समस्या उद्भवू लागतात. त्यातच वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरणामुळे निर्माण झालेल्या प्रदुषणाचा शरीरावर होणारा परिणाम वेगळाच. या सर्व समस्यांचा विचार केला तर आज प्रत्येकजण एखाद्यातरी आजाराने ग्रस्त आहेच. त्यात ताणतणाव, नैराश्य, उदासिनता, नकारात्मकता, एकाकीपणा आदी आजार प्रामुख्याने जाणवतात.
यासर्व समस्यांपासून सुटका मिळण्यासाठी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी योगा सर्वात उपयुक्त असून हा मार्ग ज्यांनीही अंगिकारला त्याचे आयुष्य सफल झाले आहे. योगातील आसनांचा नियमित सराव केल्यास लठ्ठपणा, अपचन, गॅसेस, ब्लडप्रेशर, डायबेटिस यासारखे विकार दूर होतात. तसेच ध्यानधारणा, प्राणायामद्वारे अस्थिर, चंचल मन, नैराश्य, उदासिनता, डिप्रेशन आदी मनोविकारांपासून नेहमीच सुटका मिळेल. शिवाय शरीर सुदृढ आणि लवचिक होऊन व्यक्तिमत्त्वात सुधारणा होते. यामुळे आत्मविश्वास वाढून आपण आयुष्यात यशस्वी होतो.
Also Read : योगा : आधार शरीर व मनाचा !