शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! कुटुंबापासून दूर राहणारे तरुण होताहेत उच्च रक्तदाबाचे शिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 09:49 IST

अनेक तरुणांना शिक्षण आणि नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने कुटुंबापासून दूर राहावे लागत आहे. मात्र अशा प्रकारे कुटुंबापासून दूर राहणे तरुणांसाठी धोकादायक ठरत आहे.

लखनौ -  बदलत्या काळाबरोबर शैक्षणिक आणि व्यावसायिक व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल झाले आहेत. त्यामुळे अनेक तरुणांना शिक्षण आणि नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने कुटुंबापासून दूर राहावे लागत आहे. मात्र अशा प्रकारे कुटुंबापासून दूर राहणे तरुणांसाठी धोकादायक ठरत आहे. कुटुंबापासून दूर राहत असलेले अनेक तरुण हायपरटेन्शनची शिकार होत असल्याचे एका अभ्यासामधून समोर आले आहे. अति तणाव आणि खाण्यापिण्याचे बदललेले चक्र यामुळे रक्तदाबाचा ताळमेळ बिघडत असून, त्यामुळे तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर उच्च रक्तदाबाची (हायपरटेन्शन) शिकार होत आहेत.आतापर्यंत 45 वर्षांपलीकडील व्यक्तींना उच्चरक्तदाबाचा त्रास होत होता. मात्र आता 30 वर्षे वयोगटातील तरुणही या आजाराची शिकार होत आहेत.  चिंताजनक बाब म्हणजे हायपरटेन्शनची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे जेव्हा असा रुग्ण तपासणीसाठी दवाखान्यात येतो तेव्हाच त्याला हायपरटेन्शनची बाधा झाल्याचे निदान होते. यासंदर्भात अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियॉलॉजीने हायपरटेन्शनचे मानदंडही कमी केले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. याआधी रक्तदाब हा 140-90 एमएमएचजी असल्यासच हायपरटेन्शनची शिकार मानले जात असे. मात्र आता रक्तदाब 130-80 एमएमएचजी असेल तरीही रुग्णाला हारपरटेन्शनची शिकार मानली जाते.  हायपरटेन्शन दोन प्रकारचे असते. एक इसेंशियल जे वयासोबत होते. हृदयविकाराचा त्रास असलेल्या रुग्णांपैकी 60 टक्के रुग्ण हे हायपरटेन्शनची शिकार झालेले असतात. मात्र त्यांना हृदयविकाराचा त्रास का सुरू झालाय. याचे कारण समजत नाही.  तर दुसरे सेकंड्री जे मुलांमध्ये कमी वयात किंवा वृद्धांमध्ये होते. मात्र आता दुसऱ्या प्रकारामधील रुग्ण अधिक प्रमाणात येत आहेत. त्यामुळे जर तुमचे वय 30 पेक्षा अधिक असेल तर नियमितपणे रक्तदाबाची तपासणी करा. तसेच तुम्हाला किडनी आणि डोकेदुखीचा त्रास असेल तर काही महिन्यांनी नियमितपणे रक्तदाब तपासा, असा सल्ला डॉक्टर देतात.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सFamilyपरिवार