विज्ञानाच्या विश्वात जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये सतत काहीना काही संशोधने सुरु असतात. काही वर्षांपासून उंदीर, डुक्कर, बकरी, कोंबडी आणि फुलपाखरांच्या जीन्समध्ये बदल करण्याचा प्रयोग सुरु आहे. पण जीन एडिटींगची महत्त्वपूर्ण पद्धत सीआरआयएसपीआरने अशक्य वाटणारं एक जेनेटिक परिवर्तन केलं आहे.
वैज्ञानिक आतापर्यंत सरपटणारा प्राणी रेप्टाइलपासून दूर होते. त्यामुळे पहिल्यांदा यावर प्रयोग करण्यात आला. पहिल्यांदाच पारदर्शी दिसणारी एनोलिस लिजार्ड म्हणजेच पालीच्या जन्माने असं झालं आहे. ही पाल जीनमध्ये बदल करुन जन्माला आलेला पहिला प्राणी आहे.
पालीच्या जन्मामुळे रिसर्चशी संबंधित जॉर्जिया यूनिव्हर्सिटी, अमेरिकाची विद्यार्थीनी एशले रेसिस सांगते की, 'मी त्या पालीला अंड्यातून बाहेर येताना पाहून स्तब्ध झाले होते. आम्ही आधी अलबिनो लिझार्ड जन्माला घालण्याबाबत काहीच विचार केला नव्हता. सायन्स मॅगझिनमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये पालीला जन्म दिल्याची सर्व माहिती दिली आहे. वैज्ञानिकांकडे आता जेनेटिक रिसर्चचा उपयोग करण्यासाठी एक नवीन मॉडल आलं आहे.
यूनिव्हर्सिटीच्या जेनेटिक्स विभागाचे डायरेक्टर डगलस मेंके यांनी सांगितले की, मनुष्य बायोलॉजीचा अभ्यास करण्यासाठी याप्रकारच्या मॉडलचा उपयोग केला जाऊ शकतो. त्यांनी सांगितले की, रेप्टाइल्स सर्वच १० हजार प्रजाती अशा रिसर्चपासून दूर होत्या. वैज्ञानिकांना वाटत होतं की, असं करणं फार कठीण होईल. पण एका रिसर्चमुळे हे शक्य झालं आहे.