शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

जागतिक मानसिक आरोग्य दिन : तुमची सहनशक्ती कमी होत चालली आहे का ?- हेमांगी म्हाप्रोळकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 2:59 PM

आज मुंबई, पुणे किंवा कोणत्याही शहरामध्ये सर्वांना एक विचित्र प्रकारच्या घाईने पछाडलेले आहे. प्रत्येकाला सगळं तात्काळ आणि कोणताही क्षण न दवडता काम व्हावं असं वाटतं.

- हेमांगी म्हाप्रोळकर

आज मुंबई, पुणे किंवा कोणत्याही शहरामध्ये सर्वांना एक विचित्र प्रकारच्या घाईने पछाडलेले आहे. प्रत्येकाला सगळं तात्काळ आणि कोणताही क्षण न दवडता काम व्हावं असं वाटतं. त्यामुळे सहन करण्याची किंवा थोडं थांबण्यासाठी लागणारा वेळ द्यायची शक्ती कोणाकडेही उरलेली नाही. ही स्थिती अत्यंत काळजी करायला लावणारी आहे. सहन करण्याची पातळी इतकी खालावली आहे की मनाचा कधीही उद्रेक होऊ शकतो. एखाद्या ज्वालामुखीतील लाव्हा त्याच्या मुखाजवळ येऊन ठेपलाय आणि तो कोणत्याही क्षणी फुटून बाहेर येऊ शकेल अशा स्थितीत लोकांची मनं जाऊन पोहोचली आहेत. ही मनं कोणत्याही कारणाने उद्रेक पावतात रोजच्या आयुष्याबाबत बोलायचं झालं आपण दररोज ज्या मार्गावरुन जातो तेथे सिग्नल आहे, तो पार करुन गेल्याशिवाय कार्यालयात जाता येणार नाही हे आपल्याला माहिती असतं. तरिही लोक ते नेहमीचे काही सेकंद थांबण्याच्या स्थितीत नसतात. मग ते उगाचच हॉर्न वाजवत बसतात किंवा सिग्नल तोडायचा प्रयत्न करतात. काही लोक दुस-यांना ओव्हरटेक करुन पुढे जाण्याचा उगाचच कुचकामी आनंद मिळवतात, त्यातून काहीच साध्य होत नाही. मग एकप्रकारती शर्यत लागल्यासारखे मीच पुढे जाणार असा प्रकार सुरु होतो. पण ही गाडीतली शर्यत गाडीतून बाहेर आले तरी ती तुमच्या मागोमाग येत असते, मग ती शर्यतीची भावना पाठलाग करते व तुमचा स्वभावही तसाच होतो. त्याचबरोबर तडजोड हा शब्दही हळूहळू नामशेष होत चालला आहे. कित्येक जोडपी योग्य समुपदेशन नसल्यामुळे संकटात सापडलेली असतात. आत्मप्रौढी, जराही तडजोड करण्यास असलेला ठाम नकार, जोडीदारावर विश्वास नसणे तसेच संशय अशा अनेक घटकांमुळे जोडप्यांमध्ये तणाळ निर्माण होताना दिसून येतो. 

आजकाल एक सर्वात जास्त आढळणारी बाब म्हणजे कामाच्या ठिकाणी होणारी विनाकारण स्पर्धा. स्पर्धा निकोप नसेल तर प्रश्न व ताण जन्मास येतात. प्रत्येकजण स्वतःची प्रतिमा दुसर्याशी ताडून पाहायला लागतो. या भावनेमुळे सतत लक्ष दुसरा काय करतोय याकडेच जाऊ लागते. इतरांनी काहीही केले की मग आपल्यामध्ये न्यूनगंड किंवा कमीपणाची भावना निर्माण व्हायला लागते. माझ्याकडे समुपदेशनासाठी एक हुशार मुलगी आली होती. अत्यंत उच्चशिक्षित पी.एचडी पदवी प्राप्त आणि आई- वडिलांची एकूलते एक मूल असणा-या या मुलीला एका वेगळ्याच न्यूनगंडाने पछाडले होते. तिच्या कार्यालयात इतर लोक घालतात तसे आपण पाश्चिमात्य पद्धतीचे कपडे घालत नाही, रात्री उशिरापर्यंत दारु पिऊन पार्टी करत नाही किंवा त्यांच्यासारखे 'भारी' आपण वागत नाही म्हणजे आपण बावळट, बिनकामाचे, गटात न बसणारे आहोत असा तिने ग्रह करुन घेतला होता. दुसरे कसे वागतात त्यावर मी माझी प्रतिमा निर्माण करणार, त्यावर मी माझा आनंद, सुख-दु:ख ठरवणार असे केल्यामुळे तिच्या स्वभावावर आणि कामावर परिणाम झाला. आपल्या सर्वांना हेच टाळायचे आहे. इतर व्यक्तीच्या कामावर आपली प्रतिमा, आनंद, समाधान, मनस्थिती अवलंबून ठेवू नका.

(लेखिका मुंबईस्थित क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट असून शहरी जीवनातील विविध प्रश्न घेऊन येणा-या लोकांना त्यांनी मदत केली आहे.)

टॅग्स :Healthआरोग्य