शहरं
Join us  
Trending Stories
1
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
2
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
3
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
4
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
5
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
6
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
7
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
8
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
9
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
10
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
11
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
12
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
13
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
14
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
15
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?
16
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
17
Diwali Car Offers: सर्वात कमी डाऊन पेमेंट भरुन व्हा टाटा पंच ईव्हीचे मालक, 'इतका' असेल ईएमआय!
18
Asrani Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले असरानी? जाणून घ्या शिक्षण आणि नेटवर्थ
19
Diwali Bonus: बोनस कमी दिला म्हणून कर्मचाऱ्यांनी केलं असं काही, काही तासांतच कंपनीचं लाखोंचं नुकसान

World Mental Health Day : आपला आहार आपल्या मेंदूवर नियंत्रण ठेवतो का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 11:31 IST

आपला आहार आरोग्य चांगलं राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. तसेच आहारात समावेश करण्यात येणाऱ्या पदार्थांचा आपल्या आरोग्यावर वेगवेगळ्या स्वरूपात परिणाम होत असतो.

(Image Credit : The Standard)

आपला आहार आरोग्य चांगलं राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. तसेच आहारात समावेश करण्यात येणाऱ्या पदार्थांचा आपल्या आरोग्यावर वेगवेगळ्या स्वरूपात परिणाम होत असतो. या सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहेत. पण आपला आहार आपल्या मेंदूवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतो. शरीरिक आरोग्यासाठी आहार जितका फायदेशीर तेवढाच मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. डेली डाएटमध्ये समाविष्ट होणारे पदार्थ मेंदूवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतात. गेल्या काही वर्षांपासून मानसिक आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. डिप्रेशन, स्ट्रेस आणि मेंटल डिसॉर्डर यांसारख्या समस्या आणखी वाढल्या आहेत. मेंदूचं आरोग्य राखण्यासाठी हेल्दी डाएट घेण्याचा सल्ला डॉक्टर नेहमी देत असतात. डाएट एक्सपर्ट्स सांगतात की, हिरव्या पालेभाज्या आणि फळं खाल्याने मानसिक आरोग्यासोबतच मेंदूचं आरोग्य राखण्यासाठीही मदत होते. व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अॅन्टीऑक्सिडंट असणारे पदार्थ मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. 

तणाव आणि डिप्रेशनपासून बचाव करण्यासाठी अनेक आहारतज्ज्ञ आणि डॉक्टर्सही काही पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. तसेच आपणही अनेक संशोधनांबाबत ऐकत असतो ज्यातून अनेक पदार्थांच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत सांगितलेले असते. 

जाणून घेऊया कोणते पदार्थ आपल्या मेंदूसाठी फायदेशीर ठरतात त्याबाबत... 

कॉफी मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर... 

काही वर्षांपासून कॉफीचं सेवन करणाऱ्यांचे प्रमाण भारतामध्ये वाढलं आहे. काही लोकांना सकाळी उठताच कॉफी पिण्याची सवय असते. कॉफीमध्ये आढळून येणारी तत्व मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी उत्तम मानली जातात. कॉफीमद्ये कॅफेन आणि अॅन्टीऑक्सिडंट असतात. ही दोन्ही तत्व मेंदूसाठी फायदेशीर ठरतात. एवढचं नाहीतर स्ट्रेस दूर करण्यासाठी कॉफी मदत करते. तसेच अल्जायमर सारख्या आजारापासूनही बचाव करते. 

साखरही मेंदूसाठी फायदेशीर 

हेल्दी डाएट टिप्समध्ये आपण अनेकदा पाहतो की, साखरेचं सेवन कमी करण्याचा सल्ला देण्यात येतो. परंतु फार कमी लोकांना माहीत आहे की, मेंदूसाठी साखर फार फायदेशीर असते. मेंदूसाठी ग्लूकोज एक प्रकारे ऊर्जा देण्याचं काम करतो. साखर खाल्याने शरीरामध्ये ग्लूकोज तयार होतं आणि जे सेरोटोनिन तयार करण्यासाठी मदत करतं. मेंदूवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेरोटोनिन अत्यंत आवश्यक असतं. 

ड्राई फ्रूट आणि बिया मेंदूसाठी ठरतात फायदेशीर...

ड्रायफ्रुट्स आणि बियांमध्ये आढळून येणारी पोषक तत्व मेंदूला पोषण देण्यासोबतच इतर रोगांपासून रक्षण करतं. ड्रायफ्रुट आणि बियांमध्ये मॅग्नेशिअम, आर्यन, झिंक यांसारखी पोषक तत्न आढळून येतात. डिप्रेशन, अल्जायमर आणि पार्किंसंस सारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी ड्रायफ्रुट्सचं सेवन फायदेशीर ठरतं.

हळद मेंदूसाठी गुणकारी 

आहारामध्ये हळदीचा समावेश अत्यंत फायदेशीर ठरतो. हळद खाल्याने मेंदूच्या पेशींना पोषण मिळतं. तसेच अनेक आजारांपासूनही बचाव होतो. जर पोषक तत्वांबाबात बोलायचे झाले तर हळदीमध्ये अॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. डिप्रेशन, तणाव आणि अल्जायमरपासून बचाव करण्यासाठी हळदीचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. 

डार्क चॉकलेट 

तणाव दूर करण्यासाठी चॉकलेट मदत करतं. याशिवाय मेंदूचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतं. जर तुम्हाला एखाद्या कामामुळे मानसिक थकवा जाणवत असेल तर डार्क चॉकलेट अत्यंत लाभदायक असतं. 

ब्रोकली मेंदूचं कार्य सुरळीत ठेवते

जर तुम्हाला मेंदूचं आरोग्य राखायचं असेल तर त्यांच्या आहारात ब्रोकलीचा समावेश करा.  ब्रोकलीमध्ये आढळून येणारी पोषक तत्व मेंदूच्या पेशींचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतात. (टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक ठरतं.)

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहार