शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

World Laughter Day : हसा चकटफू, फायदे होतील खूप! जाणून घ्या हसण्याचं महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 13:26 IST

आजच्या धावपळीच्या जीवनात कामाच्या प्रेशरमुळे लोक हसणेच विसरल्याचे दिसते. असे म्हणतात की, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन.

आजच्या धावपळीच्या जीवनात कामाच्या प्रेशरमुळे लोक हसणेच विसरल्याचे दिसते. असे म्हणतात की, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. हे खरंच आहे की, हसणे हा अनेक रोगांवरील रामबाण उपाय मानला जातो. तुम्हीही सकाळी फिरायला गेल्यावर अनेकांना जोरजोरात हसताना पाहिले असेल. हा नजारा बघणे जरा विचित्र ठरु शकतं पण हे आरोग्यासाठी फार महत्त्वाचं आहे. 

दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी 'वर्ल्ड लाफ्टर डे' साजरा करण्यात येतो. या दिवसाची सुरुवात मुंबईमधूनच झाली होती. हा दिवस सर्वात आधी 10 मे, 1998 या दिवशी डॉ. मदन कटारिया यांनी साजरा केला होता. आज दिवसभरामध्ये जवळपास 70 देशांमध्ये मे महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा करण्यात येतो. हा दिवस साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश म्हणजे, लोकांना हसण्याच्या फायद्यांबाबत जागरूक करणं हाच आहे. जाणून घेऊया वर्ल्ड लाफ्टर डेच्या निमित्ताने हसण्याच्या काही फायद्यांबाबत...

- हसण्यामुळे शरीराला एकप्रकारे ऊर्जा मिळते. त्यामुळे आयुष्य वाढते. ब्लेड प्रेशर कमी होऊन, दु:ख दूर करण्याचे कामही या हसण्यामुळे होते. शरीरासोबत मेंदूचाही व्यायाम होतो.

- चेहऱ्यावरवरील स्नायू सक्षम ठेवणे आणि रक्तसंचार वाढवण्यात हसण्याची भूमिका महत्त्वाची असते. यामुळे चेहऱ्यावरील टवटवीतपणा कायम राहतो.

- हसण्यामुळे शरीराची रोगप्रतिकार क्षमता व संसर्गासोबत लढणारी प्रणाली सक्षम होते. त्यामुळे संसर्ग आणि अ‍ॅलर्जीच्या प्रभावात येण्यापासून संरक्षण होते. तसेच आजारही दूर ठेवता येतात.

- ज्यांना ह्दयांचा आजार आहे, अशांसाठी हसणे हे फार उपयुक्त आहे. 10 मिनिटे व्यायाम केल्याने जेवढी ह्दयगती तीव्र होते. तितक्या ह्दयगतीसाठी एक मिनिट हसणे पुरेसे आहे. हे एका संशोधनातून समोर आले आहे.

- आपली गुणवत्ताही हसण्यामुळे वाढविता येते. कारण की, हसण्यामुळे काम किंवा वाचनावर लक्ष केद्रिंत होते. त्यामुळे आपली गुणत्ता सिद्ध होते.

- हसणाऱ्या व्यक्तिच्या मनात नेहमी सकारात्मक विचार येतात. जवळचे संबंध निर्माण होण्यासाठी हसणे हे खूप महत्त्वाचे आहे. नेहमी हसतमुख व उत्साह असणाऱ्या व्यक्तिकडे लोक आकर्षिंत होत असतात.

- हसण्यामुळे डोपामाइन आणि ग्रोथ हार्मोन्सची सक्रियता वाढते. त्यामुळे कितीही तणाव असला तरीही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.

- हसत राहिल्याने चटपटीत खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे वाढणारे वजनही नियंत्रीत ठेवता येते. जास्त खाणे व तणाव या गोष्टी वजन वाढण्यासाठी कारणीभूत आहेत.

- हसल्याने शरीरात एंडोर्फिस हा फील गुड करणारा घटक क्रियाशील होतो. त्यामुळे शरीराचा भागात होत असलेला  हसण्यामुळे कमी होतो. पेन किलरप्रमाणे हा रासयनिक घटक काम करतो.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

टॅग्स :World Laughter Dayजागतिक हास्य दिनHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स