शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

World kidney day 2019 : किडनी खराब होण्याची कारणं आणि लक्षणं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 13:56 IST

बदललेली जीवनशैली आणि धकाधकीचा दिनक्रम, प्रदूषित पाणी आणि प्रदूषण यांसारख्या कारणांमुळे शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

बदललेली जीवनशैली आणि धकाधकीचा दिनक्रम, प्रदूषित पाणी आणि प्रदूषण यांसारख्या कारणांमुळे शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच यांमुळे किडनीच्या आजारांचाही सामना करावा लागतो. अशातच भारतामध्ये क्रॉनिक किडनीचे आजार होण्याच्या समस्यांमध्ये वेगाने वाढ होत आहे. नियमित दिनक्रम आणि संतुलित आहात यांमुळे किडनीच्या आजारांपासून बचाव करणं सहज शक्य होतं. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार,  जर तुम्हाला काही दिवसांपासून कंबरदुखी, पायांमध्ये सूज इत्यादी समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्हाला किडनीचे विकार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

या लक्षणांवरून ओळखू शकता तुमची किडनी हेल्दी आहे की नाही?

- किडनीचं महत्त्वाचं काम आहे, शरीरातील टॉक्सिन्स पदार्थ बाहेर टाकणं. जेव्हा किडनीच्या या कामामध्ये अडथळे निर्माण होतात त्यावेळी किडमध्ये टॉक्सिन्स मोठ्या प्रमाणावर जमा होतात. त्यामुळे हातापायांवर आणि चेहऱ्यावर सूज येते. 

- लघवीचा रंग गडद होतो. जर तुम्ही पाणी कमी पित असाल किंवा तुम्हाला लघवी करताना त्रास होत असेल तर ही किडनीच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होत असल्याची लक्षणं आहेत. याव्यतिरिक्त लघवी करताना वेदना किंवा जळजळ होणं यांसारख्या समस्यांचा सामना करत असला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

- लघवीमध्ये रक्त येण्यासारख्या समस्यांचा समना करावा लागत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

- शरीरामध्ये कमजोरी, थकवा किंवा हार्मोन्समध्ये होणारी कमतरता म्हणजे किडनी खराब होण्याचं लक्षण आहे. 

- ऑक्सिजनचा स्तर कमी होणं ज्यामुळे चिडचिड आणि एकाग्रता कमी होत असेल तर किडनीच्या आजारांचं लक्षण आहे. 

- उन्हाळ्यामध्ये थंडी वाजत आणि ताप येत असेल तर किडनी खराब होण्याचे संकेत आहेत. 

- किडनी खराब झाल्याने शरीरामध्ये विषारी पदार्थ जमा होतात. ज्यामुळे त्वचेवर रॅशेज आणि खाज येण्यासारख्या समस्या होतात. परंतु असं गरजेचं नाही ही सर्व लक्षणं फक्त किडनीच्या आजारांमध्येच दिसून येतात. 

- किडनीच्या आजारामुळे रक्तामध्ये युरियाचा स्तर वाढतो. हा युरिया अमोनियाच्या रूपामध्ये उत्पन्न होतो. ज्यामुळे तोंडातून दुर्गंध येणं आणि जीभेची चव बिघडणं यांसारख्या समस्या होतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स