शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

World Diabetes Day : तुमच्या मुलांना मधुमेह तर नाही ना? अशी घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 13:58 IST

डायबिटीज एक गंभीर आजार आहे. याकडे दुर्लक्ष केलं तर अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. सध्या देशासह संपूर्ण जगभरातही या आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांची संख्या वाढत आहे.

डायबिटीज एक गंभीर आजार आहे. याकडे दुर्लक्ष केलं तर अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. सध्या देशासह संपूर्ण जगभरातही या आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांची संख्या वाढत आहे. मोठ्या माणसांसोबतच अनेक लहान मुलांमध्येही या आजाराची लक्षणं दिसून येत आहेत. या आजाराची लक्षणं लहान मुलांमध्ये का दिसून येत आहेत? आणि या आजाराची लक्षणं कशी ओळखावी? याबाबत जाणून घेऊया...

अनेक लहान मुलं मधुमेहाने ग्रस्त 

बदललेली जीवनशैली, जंकफूड आणि कमी शारीरिक श्रम या कारणांमुळे लहान मुलांमध्येही मोठ्या आजाराची लक्षणं दिसून येत आहेत. हा आजार होण्याचं कारण बऱ्याचदा आनुवंशिक असतं. त्याचप्रमाणे बदललेली आणि धावपळीची जीवनशैली हेदेखील कारण ठरतं.  ज्या मुलांच्या आई-वडिलांना डायबिटीज आहे त्या मुलांमध्ये डायबिटीज होण्याचा धोका वाढतो. भारतामध्ये 10 लाखांपेक्षा जास्त मुलांना टाइप-2 डायबिटीज आहे. प्रत्येक वर्षी जवळपास 80 हजार मुलं मधुमेहाने ग्रस्त होतात. दरवर्षी या संख्येत वाढ होत आहे. 

ही आहेत लक्षणं 

जर तुमच्या मुलांना सतत तहान- भूक लागत असेल किंवा सतत लघवी करण्याची इच्छा होत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. मधुमेह हा फार घातक आजार असून लहान मुलांना तो झाला तर त्याचा परिणाम त्यांचे डोळे आणि किडनीवर होऊ शकतो. असं देखील आढळून आलं आहे की, मधुमेहाने पीडित असलेल्या मुलांमध्ये एनर्जी लेव्हल फार कमी असते. त्यांना थकवा लगेच येतो. 

असा करा बचाव

मधुमेहापासून बचाव करण्याचा सर्वात उत्तम पर्याय म्हणजे आहाराकडे व्यवस्थित लक्ष देणं. आपल्या मुलांच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळं आणि डाळींचा समावेश करा. लहानपणापासूनच त्यांना शारीरिक श्रमाची म्हणजेच अॅक्टिव्ह राहण्याची सवय लावा.

अॅक्टिव्ह राहण्यासाठी व्यायामाची सवया लावा

लहान मुलांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी व्यायाम फायदेशीर ठरतो. त्यामुळे त्यांना दररोज सकाळी उठून व्यायाम करण्याची सवय लावा. दिवसभर घरामध्ये राहून टीव्ही किंवा कंम्प्यूटरसमोर बसण्याऐवजी त्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त करा. त्यामुळे शरीराचा व्यायाम होईल. 

डॉक्टरांचा सल्ला घ्या 

जर आई-वडीलांपैकी कोणाला मधुमेह असेल तर मुलांनाही डायबिटीज होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य त्या तपासण्या करून घेणं आवश्यक असतं. 

टॅग्स :World Diabetes Dayजागतिक मधुमेह दिनHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यdiabetesमधुमेह