शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

World Cancer Day 2022 : पुरूषांमध्ये ही ९ लक्षणं असू शकतात कॅन्सरचे संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 11:47 IST

World Cancer Day 2022 : सुरूवातीलाच कॅन्सरची लक्षणं (Cancer Symptoms) माहिती करून घेऊन हा आजार गंभीर होण्यापासून रोखला जाऊ शकतो. चला जाणून घेऊ पुरूषांमध्ये कॅन्सरसंबंधी लक्षणं. ज्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

World Cacer Day 2022 : ४ फेब्रुवारीला वर्ल्ड कॅन्सर डे असतो. लोकांना या गंभीर आजाराबाबत जागरूक करण्यासाठी, लक्षणांची माहिती देमे आणि बचावाचा उपाय हे लोकांना सांगितले जातात. दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू या केवळ कॅन्सरमुळे होतो. कॅन्सरवरील उपचार बरेच उशीरापर्यंत चालतात आणि अनेक लोक या विरोधातील आपली लढाई हरतात. सुरूवातीलाच याची लक्षणं (Cancer Symptoms) माहिती करून घेऊन हा आजार गंभीर होण्यापासून रोखला जाऊ शकतो. चला जाणून घेऊ पुरूषांमध्ये कॅन्सरसंबंधी लक्षणं. ज्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये..

लघवी करताना त्रास - काही पुरूषांमध्ये वय वाढण्यासोबत लघवीची समस्या वाढते. रूग्णाला पुन्हा पुन्हा लघवीसाठी बाथरूमला जाण्याची गरज पडते. अनेकदा लघवी कंट्रोलही होत नाही. लघवी करताना जळजळ जाणवते आणि कधी कधी तर रक्तही निघतं. प्रोस्टेट ग्लॅंड वाढल्याने ही लक्षणं दिसतात. हा प्रोस्टेट कॅन्सरही असू शकतो. अशी काहीही समस्या जाणवली तर वेळीच डॉक्टरांना संपर्क साधा.

त्वचेत बदल - जर तुमच्या त्वचेवर तीळ किंवा चामखीळ असेल याच्या आकारात किंवा रंगात बदल होऊ शकतो. त्वचेवर काही डाग अचानक दिसू शकतात.  जर तुम्हाला असं काहीही दिसलं तर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांकडे जा. हे स्कीन कॅन्सरची लक्षणं असू शकतात. 

गिळण्यात त्रास - कॅन्सरमुळे काही लोकांना अन्न गिळण्यात त्रास जाणवू शकतो. जर गिळण्यात त्रास होण्यासोबतच तुमचं वजन अचानक कमी होत असेल किंवा उलटी होत असेल तर वेळीच डॉक्टरांना संपर्क करा. तुम्ही घसा किंवा पोटाच्या कॅन्सरची टेस्ट करावी.

छातीत जळजळ - जर तुम्हाला छातीत सतत जळजळ होत असेल आणि डाएटमध्ये बदल करूनही ही जळजळ कमी होत नसेल तर तुम्ही याकडे लक्ष द्यायला हवं. छातीत जास्त जळजळ होणं पोटाचा किंवा घशाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.

तोंडात बदल - जर तुम्ही स्मोकिंग करत असाल किंवा तंबाखू खात असाल तर तुम्हाला माऊथ कॅन्सर होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. यामुळे तुमच्या तोंडात आणि ओठांवर पांढरे, लाल, भुरक्या रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे डाग दिसू शकतात. तुम्हाला तोंडात घावही होऊ शकतो जो अल्सरसारखा दिसतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार घ्या.

वेगाने वजन कमी होणे - कोणताही प्रयत्न न करता तुमचं वजन कमी होत असेल तर हे स्ट्रेस किंवा थायरॉइडमुळे होऊ शकतं. या समस्या नसतानाही तुमचं वजन कमी होत असेल तर हे पॅक्रियाज, पोट किंवा लंग कॅन्सरचं लक्षण असू शकतं. ब्लड टेस्टच्या माध्यमातून याची माहिती मिळू शकते.

टेस्टिकल्समध्ये बदल - हेल्थ एक्सपर्टनुसार टेस्टिकलमध्ये गाठ, जडपणा किंवा कोणताही बदल दिसत असेल तर अजिबात उशीर करू नका.  योग्य वेळेवर याची माहिती मिळाली तर योग्य उपचार घेता येईल. 

छातीत बदल - छातीत कोणत्याही प्रकारची गाठ होत असेल पुरूषांमध्ये हे ब्रेस्ट कॅन्सरचं लक्षण असू शकतं. सामान्यपणे पुरूष ब्रेस्टशी संबंधित या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. ज्यामुळे ही समस्या अधिक वाढते. वेळीच डॉक्टरांना संपर्क साधावा.

थकवा - अनेक प्रकारच्या कॅन्सरमध्ये फार जास्त थकवा जाणवू शकतो. आराम करूनही थकवा दूर होत नाही. हा थकवा फार काम केल्यावर येणाऱ्या थकव्यापेक्षा वेगळा असतो. जर तुम्हालाही फार थकवा जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांना संपर्क साधा.. 

टॅग्स :cancerकर्करोगHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स