Asthma Day :  केवळ दम्यामुळेच नाही तर 'या' कारणांनीही लागते धाप! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 12:12 PM2019-05-07T12:12:00+5:302019-05-07T12:17:18+5:30

अस्थमा म्हणजेच दम्याचं पहिलं लक्षण हे धाप लागणे मानलं जातं. श्वासनलिकेला आकुंचन पावल्याने, फुप्फुसांवर सूज आल्याने व्यक्तील श्वास घेण्यास त्रास होतो. ज्यामुळे धाप लागते.

World Asthma Day : You must know the other reasons of breathlessness | Asthma Day :  केवळ दम्यामुळेच नाही तर 'या' कारणांनीही लागते धाप! 

Asthma Day :  केवळ दम्यामुळेच नाही तर 'या' कारणांनीही लागते धाप! 

Next

(Image Credit : Medscape)

अस्थमा म्हणजेच दम्याचं पहिलं लक्षण हे धाप लागणे मानलं जातं. श्वासनलिकेला आकुंचन पावल्याने, फुप्फुसांवर सूज आल्याने व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो. ज्यामुळे धाप लागते. पण तुम्हाला माहीत आहे का की, धाप लागणे हे केवळ दम्याचं लक्षण नाहीये. इतरही काही कारणांमुळे धाप लागण्याची समस्या होते. चला जाणून कोणती आहेत ही कारणे...

का लागते धाप?

(Image Credit : FindaTopDoc)

दम्याची समस्या झाल्याने फुप्फुसावर सूज येते आणि श्वास घेण्यास अडचण येते. फुप्फुसं ही श्वासांसाठी एका फॅक्टरीसारखी असतात, जर यात काही समस्या झाली तर श्वास घेण्यास त्रास होतो. तसेच सीओपीडी आणि न्यूमोनियामुळेही फुप्फुसं प्रभावित होतात. 

तणाव किंवा चिंतेत

(Image Credit : New York Post)

जेव्हाही श्वास घेण्याची समस्या तणावासोबत येते तेव्हा यामागे हायपरव्हेंटिलेशनची समस्या असू शकते. याचा अर्थ अधिक श्वास घेणे. जेव्हाही व्यक्ती चिंतेत अशतो तेव्हा वेगाने श्वास घेऊ लागतो. जास्त श्वास घेण्याचा अर्थ हा आहे की, तुम्ही अधिक प्रमाणात ऑक्सिजन घेत आहात आणि तेवढ्याच प्रमाणात कार्बनडायऑक्साइड शरीरातून बाहेर सोडत असता. यामुळेही तुम्हाला धाप लागू शकते.

अ‍ॅलर्जीमुळे

अ‍ॅलर्जीमुळेही धाप लागण्याची समस्या होऊ शकते. अ‍ॅलर्जी इम्यूडन सिस्टीमशी निगडीत समस्या आहे. याने फार नुकसान होत नाही. अ‍ॅलर्जीची समस्या धूळ, माती, पगारकण इत्यादींच्या संपर्कात आल्याने होऊ शकते. अ‍ॅलर्जी झाल्यावर रूग्णाच्या फुप्फुसाच्या वाहिका प्रभावित होतात आणि श्वास घेण्यास अडचण येऊ लागते. याने छातीत दुखण्याची समस्या देखील होऊ शकते. 

लठ्ठपणामुळे

(Image Credit : Medical News Today)

लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या आहे. यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचे तुम्ही शिकार होता. त्यात डायबिटीस, थायरॉइट, हृदयरोग इत्यादींचा समावेश करता येईल. त्यासोबतच लठ्ठपणामुळेही धाप लागण्याची समस्या होते. थोरेक्स नावाच्या मॅगझिनमध्ये प्रकाशित एका शोधानुसार, लठ्ठपणामळे छोटे छोटे काम जसे की, पायऱ्या चढणे यातही समस्या येते. याने श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे वजन हे बीएमआयनुसारच ठेवा.

हृदयघाताचा संकेत

(Image Credit : Towards Data Science)

एन्जायना, हृदयविकाराचा झटका, जन्मजात हृदयाची समस्या या सुद्धा श्वासाशी संबंधित आहेत. जेव्हा धाप लागते तेव्हा हृदयाशी संबंधित वेगवेगळी कारणे असू शकतात. जेव्हा हृदयाच्या मांसपेशी योग्यप्रकारे काम करू शकत नाहीत तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. तसेच कमी श्वासामुळे हृदयविकाराचा झटका पडण्याचा धोकाही वाढतो. तसेच रक्तप्रवाह जेव्हा वाढतो म्हणजे रक्तदाब जेव्हा वाढतो तेव्हा हृदयाशी संबंधित समस्या होते आणि रूग्णाला श्वास घेण्यास अडचण येते. 

Web Title: World Asthma Day : You must know the other reasons of breathlessness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.