शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

World Asthma Day 2018 : काय आहेत अस्थमा आजाराची लक्षणे, कशामुळे होतो अस्थमा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 12:36 IST

या आजाराच्या रुग्णांना एकीकडे श्वास घेण्यास त्रास होतो तर दुसरीकडे त्यांना श्वास थांबण्याचाही त्रास होतो. चला जाणून घेऊया अस्थमा किंवा दम्याची लक्षणे आणि त्याचा धोका...

अस्थमा किंवा दमा हा श्वसन तंत्राशी निगडीत आजार आहे. या आजाराने श्वास घेण्यास त्रास होतो. या आजारात श्वासनलिकेच्या मार्गात सूज येते आणि हा मार्ग आकुंचन पावतो. या त्रासामुळे रुग्णांना लहान श्वास घ्यावा लागतो. कारण छातीत एकप्रकारचा तणाव निर्माण होत असतो. श्वास भरून येतो आणि त्यामुळे जोरदार खोकलाही येतो. अॅलर्जीमुळे छातीत कफ तयार होतो. या आजाराच्या रुग्णांना एकीकडे श्वास घेण्यास त्रास होतो तर दुसरीकडे त्यांना श्वास थांबण्याचाही त्रास होतो. चला जाणून घेऊया अस्थमा किंवा दम्याची लक्षणे आणि त्याचा धोका...

उन्हाळ्यातही असतो अस्थम्याचा त्रास

उन्हाळ्याच्या दिवसात अस्थमा कमी आढळतो किंवा त्याचा त्रास कमी होतो, त्यामुळे अनेकजण अस्थमाबाबत निष्काळजी होतात. पण असे नाहीये की, उन्हाळ्यात अस्थम्याचा त्रास होत नाही. गरमीच्या दिवसात अस्थम्याचे रुग्ण हे औषधं घेण्यास आणि काळजी घेण्यास दुर्लक्ष करतात. त्यामुळे या दिवसातही अस्थम्याचा अटॅक येऊ शकतो. उन्हाळ्यात अस्थमा येण्याची कारणे खालीलप्रमाणे असू शकतात.

अस्थमा अटॅकची कारणे

- धूळ आणि वायु प्रदुषण- सर्दीची समस्या- वातावरणातील बदल- इन्फेक्शन- थंड पदार्थांचे सेवन- अॅलर्जी- जेनेटिक कारण - मानसिक तणाव- स्मोकिंग - अल्कोहल

अस्थम्याची कारणे

अस्थमा नियंत्रित करता येतो. अस्थमा होण्याची प्रमुख कारणे म्हणजे बालवयामध्ये घरामधील प्रदुषणांशी येणारा घनिष्ट संबंध, अनुवांशिक दम्याचा त्रास तसेच अंडी, शेंगदाणे व दुग्धजन्य पदार्थांची लहान मुलांना होणारी ऍलर्जी. मुलांना होणाऱ्या ऍलर्जिक दम्याचे परिक्षण केलेले नसल्यास ते त्वरित करणेही आवश्यक आहे. तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ व त्याचा धूर तसेच रासायनिक पदार्थांशी आपापल्या कामाच्या ठिकाणी येणारा संपर्क हा अतिरिक्त अपायकारक घटक आहे.

इतर त्रासदायक घटक म्हणजे काही औषधे (ऍस्प्रीन व तत्सम स्टेरोईड नसलेली औषधे), मुलाचे जन्मसमयी कमी असलेले वजन आणि श्वसनमार्गावरील जंतुप्रादुर्भाव, तणाव व शारीरिक कष्टामुळे दमा होऊ शकतो तसेच हवामानातील बदल (थंड हवामान) किंवा दमटपणा यामुळेही दम्याचा विकार बळावतो. वाढते शहरीकरण हे दम्याचे प्रमुख कारण बनत आहे. अजूनही घरातील ऍलर्जिक घटकांचा पूर्ण अभ्यास न झाल्यामुळे यातील धोक्याची संपूर्ण कल्पना आपल्याला आलेली नाही.

अस्थमा होण्याची लक्षणे

श्वास घेण्यास त्रास होणे हे अस्थमाचे पहिले लक्षण आहे. अस्थमा हा आजार एकतर अचानक होतो नाहीतर खोकला, सर्दी या अॅलर्जीच्या लक्षणांनी सुरु होतो. अस्थमाची लक्षणे खालीलप्रमाणे सांगता येतील. ही लक्षणे आढळली तर लगेच डॉक्टरांशी संपर्क करा.

- श्वास घेण्यास त्रास होणे- छातीत तणाव निर्माण होणे- श्वास घेतांना घाबरल्यासारखं होणे- श्वास घेताना घाम सुटणे- अस्वस्थता जाणवणे

अस्थमा रुग्णांनी या गोष्टींची घ्या काळजी

- नेहमी सोबत इनहेलर ठेवा- घर नेहमी स्वच्छ ठेवा- धूळ-मातीपासून दू रहा- व्यायाम आणि योगासने करुन शांत व्हा- तोंडाने श्वास घेऊ नये

अस्थम्याचा अटॅक आल्यावर का करावे?

- सरळ ताठ उभे राहा, झोपून राहू नका- मोठा श्वास घ्या- डॉक्टरांनी दिलेली औषधं घ्या- सैल कपडे घाला

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य