(Image Credit : The Cheat Sheet)
पोटाचा कॅन्सर इतर कॅन्सरप्रमाणेच जीवघेणा असतो. पुरूष असो वा महिला सर्वांसाठीच कॅन्सर हा घातक ठरू शकतो. मात्र अशात एका रिसर्चमधून दावा करण्यात आला आहे की, ज्या महिलांना अन्न नलिकेचा किंवा पोटाचा कॅन्सर असतो त्या महिला पुरूषांच्या तुलनेत अधिक काळ जगतात. सोबतच त्यांना किमोथेरपी दरम्यान उलटी, मळमळ व डायरियाचा सुद्धा त्रास होतो.
या रिसर्चमुळे पोटाच्या कॅन्सरने पीडित रूग्णांचं चांगल्याप्रकारे परीक्षण करण्याचा फायदा मिळेल. सोबतच या रिसर्चच्या परिणामांच्या आधारावर आता सहजपणे हे समजून घेता येईल की, लोकांमध्ये कॅन्सरच्या दुष्परिणामांचा अधिक धोका असतो. पोटाच्या खालच्या भागात खूपसाऱ्या पेशी असतात आणि जेव्हा या कोणत्याही अडचणीशिवाय वाढू लागतात तेव्हा कॅन्सरचं रूप घेतात.
ब्रिटनच्या रॉयल मार्सडेन हॉस्पिटलच्या अवनी अथोदा ह्या या रिसर्चच्या मुख्य लेखिका आहेत. त्या म्हणाल्या की, 'आपण अन्न नलिका आणि पोटाच्या कॅन्सरच्या उपचारासाठी स्ट्रॅंडर्ड ट्रीटमेंटचा वापर केला जातो. पण या रिसर्चमधून महिला आणि पुरूष रूग्णांमध्ये दोन वेगवेगळे फरक बघायला मिळतात. एकतर हा की, किमोथेरपीदरम्यान कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया देतात आणि दुसरा हा की, कॅन्सरच्या उपचारानंतर ते किती काळ जगतात. त्यामुळे महिलांच्या संदर्भात उपचारादरम्यान पोट आणि अन्न नलिकेच्या कॅन्सरच्या थेरपीने होणारे साइड इफेक्ट्सबाबत त्यांना जागरूक करणे आणि सल्ला देणे महत्त्वाचं ठरू शकतं'.
या रिसर्चसाठी वैज्ञानिकांनी मुख्य रूपाने यूकेमध्ये आधीच प्रकाशित चार रॅंडम पद्धतीने केल्या गेल्या परिक्षणांमधून आकडेवारी घेतली आणि त्यांचं विश्लेषण केलं. हा रिसर्च त्यांनी ३ हजार रूग्णांवर केला. ज्यातील २, ६६८ रूग्ण पुरूष होते तर ५९७ महिला होत्या.
वैज्ञानिकांना यातून आढळलं की, पुरूष रूग्णांच्या तुलनेत महिला रूग्णांना उलटी, मळमळ आणि डायरियासारख्या समस्यांचा अनुभव येतो. सोबतच हा निष्कर्ष काढण्यात आला की, महिला रूग्ण पुरूष रूग्णांच्या तुलनेत अधिक काळ जगतात. हा रिसर्च अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑनकोलॉजीमध्ये सादर करण्यात आला.