शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Women drink own urine : OMG! लसीवर भरवसा नाही; म्हणून कोरोनापासून बचावासाठी ती चक्क प्यायली स्वतःचं मुत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 14:42 IST

Women drink own urine for prevent corona : इतकंच नाही तर तिच्या मुलांनाही तिनं असाच प्रकार करायला लावला.

कोरोनामुळे संपूर्ण जगभरात चिंताजनक वातवरण आहे. जानेवारी महिन्यात लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला. थोड्याफार प्रमाणात लोक रिलॅक्स झालेले पाहायला मिळाले. पण आता पुन्हा भारतातसह जगभरातील इतर देशांमध्ये कोरोनाची प्रकरणं वाढत असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सुरूवातीपासूनच लोक कोरोनाच्या भीतीनं घरगुती उपाय करत आहेत. या उपयांचा अतिरेक वाटेल अशी बातमी सध्या समोर येत आहे.

लंडनमधील एका महिलेनं कोरोनापासून बचाव करण्य्साठी चार दिवस स्वतःची लघवी प्यायली आहे. इतकंच नाही तर तिच्या मुलांनाही तिनं असाच प्रकार करायला लावला. लंडनच्या हेल्थवॉच सेंट्रल हेल्थने (Healthwatch Central Health London) नुकत्याच प्रकाशित केलेल्या एका अहवालात हे कुटुंब व्हॉट्सअ‍ॅपवरील फेक मेसेजला बळी पडल्याचं सांगितलं आहे.

लंडनमध्ये राहणाऱ्या या महिलेला आपल्या जवळच्या मित्राकडून हा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज फॉरवर्ड करण्यात आला होता. यामध्ये कोरोनातून बरे होण्यासाठी स्वत:ची लघवी प्या असं सांगण्यात आलं होतं. मेसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे महिला स्वतःची लघवी प्यायली मुलांनाही तेच करायला सांगितलं. समोर आलेल्या माहितीनुसार या महिलेनं असं काही केलं यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. हादरवणारी बातमी! दक्षिण आफ्रिकेच्या धोकादायक कोरोना स्ट्रेनचा भारतात शिरकाव; अधिक सर्तक राहावं लागणार

या महिलेनं  WCHL ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, 'माझा कोरोनावर लशीवर अजिबात विश्वास नाही पण मला कोरोनावरील घरगुती उपायांववर विश्वास आहे.' म्हणूनच कदाचित उपायांची कोणतीही शाहानिशा न करता या महिलेनं हा भयंकर प्रकार केला. दरम्यान कोरोनाकाळात सुरूवातीपासूनच अनेक अफवा पसरवल्या होत्या. त्यामुळे शासनाकडून वारंवार योग्य मार्गदर्शनानुसार वर्तन करण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले जात होते. सायलेंट हार्ट अटॅकचं कारण ठरू शकतात ही लक्षणं; घाबरण्याआधीच जाणून घ्या महत्वाच्या टिप्स 

टॅग्स :Healthआरोग्यJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल