(image credit- womenshealtj.gov)
बदलती जीवनशैली, वातावरणात होणारा बदल यांमुळे महिलांच्या आरोग्यावर नकारात्मक परीणाम होत असतो. तसंच कमी वयात सुध्दा अनेक गंभीर स्वरूपाचे आजार उद्भवत आहेत. रक्तदाबाच्या समस्येपासून, मधुमेह तसेच मानसीक आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे आजार होत आहेत. जर वेळीच या आजारांकडे लक्ष दिलं नाही तर गंभीर परिणामांचा सामना करावा लागू शकतो.
सर्वसाधारणपणे २० ते ३० या वयोगटातील महिलांमध्ये आजारांचे प्रमाण जास्त दिसून येते. कमी वयात होणारे शरीरसंबंध तसंच मासिकपाळीच्या वेळी व्यवस्थीत स्वच्छता पाळली न गेल्याने महिलांमध्ये गंभीर स्वरूपाचे आजार पसरत आहेत. शरीरातील प्रत्येक बाब मेंदूशी निगडित असल्याने या हार्मोन्सचाही मेंदूवर परिणाम होतो. त्यांचे संतुलन बिघडल्यामुळे स्त्रियांना हे आजार होतात.
अमेरिकन सेक्शुअल हेल्थ असोसिएशनच्या म्हणण्यानुसार सेक्शुअली अॅक्टीव्ह असलेल्या महिलांमध्ये २५ वर्षावरील वयोगटातील सेक्शुअल ट्रांसमिटेड इन्फेक्शन (एसटीआई) या आजारांनी ग्रस्त असलेल्या महिलांचे प्रमाण अधिक होते. ४१.३ टक्के महिला या हरपीज सिंप्लेक्स वायरस १ या आजाराने पीडित होत्या. ही माहिती अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि रोग निवारण केंद्रामार्फत प्राप्त झाली आहे.
या आजारांपासून वाचण्यासाठी शरीर संबंध ठेवत असताना स्वच्छ असणं फार महत्वाचं असतं. तसंच २० ते ३० वर्ष वयेगटातील महिलांना मेलेनोमा या कॅन्सरचा आजाराचा धोका असण्याची शक्यता असते. हा एक त्वचेशी संबंधीत कॅन्सर आहे. याच वयात महिलांना चिंता, अस्वस्थता यांचं प्रमाण वाढीस लागून मानसीक आजार उद्भवण्याचा धोका जास्त असतो. रक्ताची कमतरता , आहारात नियमीतता नसणं, हेल्दी आहार न घेणं यामुळे महिलांमध्ये आजाराचा धोका सर्वाधिक उद्भवतो.