गरोदरपणात स्त्रियांच्या मेंदूत होतात सकारात्मक बदल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 18:27 IST2016-12-23T18:27:14+5:302016-12-23T18:27:14+5:30

गरोदरपणात स्त्रियांच्या मेंदूत सकारात्मक बदल होत असल्याचे एका संशोधनानुसार नुकतेच सिद्ध झाले आहे. हे बदल बुद्धिमत्तेमध्ये होत असून, यामुळे स्मरणशक्ती व मानसिक क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही, असेही अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

Women become pregnant with positive changes in pregnancy! | गरोदरपणात स्त्रियांच्या मेंदूत होतात सकारात्मक बदल!

गरोदरपणात स्त्रियांच्या मेंदूत होतात सकारात्मक बदल!

ोदरपणात स्त्रियांच्या मेंदूत सकारात्मक बदल होत असल्याचे एका संशोधनानुसार नुकतेच सिद्ध झाले आहे. हे बदल बुद्धिमत्तेमध्ये होत असून, यामुळे स्मरणशक्ती व मानसिक क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही, असेही अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. गरोदर महिलांना भविष्यात मूल सांभाळताना येणाºया आव्हानांशी सामना करण्यात यावा म्हणून हे बदल घडत असतात. 
पहिल्यांदाच गरोदर होणाऱ्या महिलांच्या गरोदरपणाच्या काळात आणि प्रसूतीनंतरच्या काळात मेंदूत होणाऱ्या बदलांचे निरीक्षण संशोधकांनी केले. तसेच पहिल्यांदा पिता होणाऱ्या पुरुषांच्या व अपत्य नसलेल्या जोडप्यांच्या मेंदूचेही निरीक्षण केले. त्यामध्ये गरोदर महिलांच्या बुद्धिमत्तेत सकारात्मक बदल होत असल्याचे समोर आले. यामुळे बाळाला होणारे आजार, भावना तसेच त्याच्या संरक्षणाची गरज समजण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे त्या मातेच्या मानसिक स्वास्थ्यावर कोणताही परिणाम होत नाही. दरम्यान प्रसूतीनंतर दोन वर्षे मातांवर संशोधन करण्यात आले पण हे बदल किती दिवस टिकतील हे त्यामुळे समोर आले नाही. 

 

Web Title: Women become pregnant with positive changes in pregnancy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.