विकी झळकणार चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2016 08:46 PM2016-04-06T20:46:58+5:302016-04-06T13:46:58+5:30

काहे दिया परदेस या मालिकेतून फार कमी कालावधीत आपल्या अभिनयाने खलनायकाच्या भूमिकेतून ही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा विकी म्हणजेच निखिल राउत आता, नायकाच्या भूमिकेत मराठी चित्रपटात लवकरच झळकणार असल्याचे निखिलने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले.

Wiki will be seen in the film | विकी झळकणार चित्रपटात

विकी झळकणार चित्रपटात

Next
हे दिया परदेस या मालिकेतून फार कमी कालावधीत आपल्या अभिनयाने खलनायकाच्या भूमिकेतून ही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा विकी म्हणजेच निखिल राउत आता, नायकाच्या भूमिकेत मराठी चित्रपटात लवकरच झळकणार असल्याचे निखिलने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. निखिलने यापूर्वी तू तिथे मी या मालिकेतूनदेखील खलनायकाची भूमिका निभावली होती. याविषयी विचारले असता निखील म्हणाला, सोशलवेबसाइडच्या माध्यमातून मला खूप वेळा चाहत्यांनी प्रश्न केला की, तू इतका हॅण्डसम,गालावर इतकी छान खळी पडते तर तू नायकाच्या भूमिकेत कधी झळकणार आता, माझ्या याच चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करत मी लवकरच खलनायकाच्या भूमिकेतून नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच एकाच भूमिकेत न अडकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दोन ते तीन मालिका देखील रिजेक्ट केल्या आहेत. पण हा चित्रपट माझ्यासाठी एक चालून आलेली छान संधी आहे. या चित्रपटात देखील चांगले स्टारकास्ट आहेत. पण चित्रपटाचे नाव अजून ही गुलदस्त्यातच असल्याचे त्याने यावेळी सांगितले.असो, चला तर निखिलच्या या नवीन प्रवासाला लोकमत सीएनएक्सच्यावतीने देखील शुभेच्छा. 
 

Web Title: Wiki will be seen in the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.