शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 12:12 IST

उतारवयात म्हणजे वयाच्या साठीनंतर होणारे हृदयाचे विकार सध्या ३० ते ४० वयोगटांतील तरुणांना जडलेले दिसत आहेत. त्यामुळे हृदयविकार तज्ज्ञांनी ३० ते ३५ वयात हृदयाची तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई : ‘कांटा लगा’फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे निधन प्रथम दर्शनी हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तरुण वयातील हृदयविकाराचा मुद्दा  पुन्हा चर्चेत आला आहे. उतारवयात म्हणजे वयाच्या साठीनंतर होणारे हृदयाचे विकार सध्या ३० ते ४० वयोगटांतील तरुणांना जडलेले दिसत आहेत. त्यामुळे हृदयविकार तज्ज्ञांनी ३० ते ३५ वयात हृदयाची तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

आधुनिक जीवनशैलीमुळे तरुणांच्या खाण्या-पाण्यापासूनच्या सर्वच सवयी बदलल्या आहेत. दररोज रात्री उशिरापर्यंत जागरण, झोप पूर्ण न होणे,  कौटुंबिक आणि व्यावसायिक ताणतणाव ही काही प्रमुख कारणे हृदयाच्या आरोग्याला बाधा पोहोचवत आहेत, असे हृदयरोग तज्ज्ञ सांगत आहेत.

अनेक वर्षांपासून मुंबईत होणाऱ्या मृत्यूच्या कारणांमध्ये हृदयरोग ‘नंबर वन’वर आहे. अनेक हृदयविकार तज्ज्ञांच्या ओपीडीमध्ये तरुण रुग्ण उपचारासाठी येताना दिसत आहेत.

हृदय रोगाची लक्षणे

छातीत कळ आल्यास ॲसिडिटी म्हणून दुर्लक्ष करू नका.

छातीत दुखणे.

श्वास घेण्यास त्रास होणे.

थोडा वेळ चालले, तरी दम लागणे, घाम येणे.

हृदयाचे ठोके वाढणे.

उपाय असे...

हृदयरोगाला प्रतिबंध करणे प्रत्येकाच्या हातात आहे. धूम्रपान, अवेळी जेवण, विशेषत: प्रक्रिया केलेले पदार्थ, जंकफूड, तेलकट आणि फॅट्स असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे ‘ट्रायग्लिसराइड्स’ची पातळी वाढते. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येतो. चांगल्या आहाराने हे टाळणे  शक्य आहे. आठवड्याला १५० मिनिटे चालले पाहिजे. ज्यांना व्यायाम करायला जमत नाही त्यांनी योगासने करावीत.

व्हिसेरा केला जतन

शेफाली जरीवालाच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात नेला होता. तेथे व्हिसेरा जतन करून ठेवल्याचे सांगण्यात येत आहे.

औषधांचा परिणाम?

जरीवाला हिच्या निधनानंतर त्याच्या मृत्यूबाबत दिवसभरात विविध चर्चा रंगल्या होत्या. त्यात वैद्यकीय उपचाराचा भाग म्हणून ती अँटी एजिंगची (लवकर वृद्धत्व येऊ नये) औषधे घेत असल्याचे सांगण्यात येत होते. त्याचा परिणाम झाला असण्याची शक्यता असावी, अशी जोरदार चर्चा होती. मात्र याला कुणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

आमच्या ओपीडीमध्ये दिवसाला हृदयविकाराच्या तक्रारीचे दोन ते तीन तरुण येतात. अनेक जणांना अँजिओग्राफीनंतर अँजिओप्लास्टीची गरज असल्याचे दिसून आले आहे. तर, काहींची थेट बायपास शस्त्रक्रिया करावी लागत आहे. त्यामुळे ३० ते ३५ वयोगटांतील तरुणांनी हृदय तपासणी करून घ्यावी. अनेक तरुण शरीरयष्टी आकर्षक राहावी म्हणून वैद्यकीय सल्ल्याशिवाय अतिरिक्त प्रमाणात  प्रोटीन, कॅल्शियम, सप्लिमेंट्स घेता. त्यामुळे देखील हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. 

डॉ. अजय चौरासिया, हृदयरोग विभागप्रमुख, नायर रुग्णालय

टॅग्स :Healthआरोग्य