शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

झोपेत पाहिलेली काही स्वप्ने सकाळी आठवत का नाहीत? जाणून घ्या कारण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 10:09 IST

अनेकदा तुम्हाला जाणवलं असेल की, एखादं भारी स्वप्न तुम्ही बघता, पण सकाळी तुम्हाला ते आठवत नाही. याचं कारण काय आहे?

(Image Credit : radioamerica.hn)

तुम्ही अनेकदा या गोष्टीवर लक्ष दिलं असेल की, आपली झोप अचानक उघडते आणि आपल्याला जाणीव होते की, आपण स्वप्नात काहीतरी बघत होतो, त्याबाबत तुम्ही फार एक्सायटेड होता किंवा घाबरलेले असता. याच एक्सायटमेंटमुळे अचानक झोप उघडली जाते. पण झोप उघडल्यावर आपल्याला आठवण राहत नाही की, आपण स्वप्नात काय बघत होतो किंवा पाहिले. तसेच अनेकदा असंही होतं की, सकाळी अलार्मचा आवाज ऐकून आपली झोप उघडते. तेव्हा असं जाणवतं की, तुम्ही झोपलाच नाहीत. तुमचा मेंदू काम करत होता. पण स्वप्नात तुम्ही काय पाहिलं हे आठवण राहतं नाही. 

(Image Credit : betterlyf.com)

मानसोपचारतज्ज्ञांनुसार, झोपेत बघितली गेलेली काही स्वप्ने लक्षात राहतात, तर काही स्वप्ने आपण विसरतो. असं स्लीपिंग पॅटर्नमुळे होतं. झोपेत आपला मेंदू झोपेच्या चार टप्प्यांमधून जात असतो. यातील पहिले तीन टप्पे हे नॉन रॅपिड आय मोमेंट असतात, ज्यांना एनआरइएम(NREM) म्हटलं जातं. झोपेचा पहिला टप्पा हा जागे असताना झोपी जाण्याचा असतो. या वेळेत शरीर दिवसाच्या अवस्थेतून स्वत:ला दूर करत रिलॅक्सिंगच्या पोजिशनमध्ये जात असतो.

(Image Credit : bustle.com)

झोपेच्या दुसऱ्या टप्प्यात बघितली गेलेली स्वप्ने आपल्याला जास्त आठवत नाही. याला NREM म्हणतात. झोपेच्या या टप्प्यात मेंदू अ‍ॅक्टिव फॉर्गेटिंग स्टेजमध्ये राहतो. एका नव्या रिसर्चमधून समोर आले की, मेंदू असं अनावश्क आठवणी डिलीट करण्यासाठी करतो. तसेच असेही समोर आले आहे की, ही स्वप्ने विसरवण्यात न्यूरॉन्स मदत करतात आणि हेच न्यूरॉन्स आपली भूक कंट्रोल करण्याचं काम करतात. जपानमधील एका युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेला हा रिसर्च जनरल सायन्समध्ये पब्लिश करण्यात आला आहे.

टॅग्स :ResearchसंशोधनMental Health Tipsमानसिक आरोग्य