शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

हृदयविकाराचा झटका का येतो?; त्यामगचं कारण, लक्षणे अन् उपाय, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 08:27 IST

कोरोनामुळे अनेकांची जीवनशैली बदलली आहे. ‘घरून काम’ या नव्या कार्यसंस्कृतीमुळे तर अनेक व्याधी जडू लागल्या आहेत. 

छोट्या पडद्यावरचा सुपरस्टार  असलेल्या सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली निधनामुळे पुन्हा एकदा जीवनशैलीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अवघ्या चाळिशीत असलेल्या सिद्धार्थला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तरुण वयात हृदयविकार जडण्याचे प्रमाण आताशा वाढू लागले आहे. हे असे का होते?

वाढता ताणकोरोनामुळे अनेकांची जीवनशैली बदलली आहे. ‘घरून काम’ या नव्या कार्यसंस्कृतीमुळे तर अनेक व्याधी जडू लागल्या आहेत.  स्थूलपणा वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. कामाचे स्वरूप बदलल्याने नवनव्या ताणांना सामोरे जावे लागत आहे. हृदयावरील ताण वाढत असल्याने एका मर्यादेपलीकडे तो असह्य होऊन हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाण तरुणांमध्ये वाढले आहे. याशिवाय वंशपरंपरेमुळेही हृदयविकाराचा त्रास जडतो.

हृदयविकाराची लक्षणे हृदयविकाराचा झटका येण्याआधी शरीर काही संकेत देत असते.या संकेतांमध्ये छातीत दुखणे वा छातीच्या आसपास अचानक दुखणे, जडत्व येणे, हात-पाय, पोट, पाठ आणि घसा यांच्यात वेदना सुरू होणे, श्वसनास त्रास जाणवणे, खूप घाम येणे, जीव घाबरणे, तीव्र डोकेदुखी, मळमळणे यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे. 

या कारणांचाही अंतर्भाव

  • फास्ट फूडचे अतिसेवन
  • उच्च रक्तदाबाचा त्रास
  • रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढ
  • मधुमेहाचा त्रास 
  • ग्रामीण भागातील तरुणांच्या तुलनेत शहरी भागातील तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण अधिक आहे. त्यासाठी आधुनिक जीवनशैलीच जबाबदार आहे.  

हृदयविकार टाळायचा असेल तर

  • आहार नियमित असणे गरजेचे
  • तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार व्यायाम आवश्यक
  • तणावमुक्तीसाठी योगसाधना करावी
  • एखाद्या सुट्टीच्या दिवशी निसर्गरम्य ठिकाणी आवर्जून जावे
  • फास्ट फूट शक्यतो टाळावे
  • आहारात पालेभाज्या आणि फळांचा समावेश अधिकाधिक असावा
टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHealthआरोग्य