शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

झोपेत अचानक जास्त थंडी का वाजू लागते? जाणून घ्या कारणे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 10:24 IST

हिवाळ्यात थंडी वाजणं स्वाभाविक आहे. पण इतरवेळीही रात्री झोपेत थंडी वाजणं सामान्य बाब नाहीये. झोप व्यक्तीसाठी तेवढीच गरजेची आहे, जेवढं श्वास घेणं आणि जेवण करणं.

(Image Credit : independent.co.uk)

हिवाळ्यात थंडी वाजणं स्वाभाविक आहे. पण इतरवेळीही रात्री झोपेत थंडी वाजणं सामान्य बाब नाहीये. झोप व्यक्तीसाठी तेवढीच गरजेची आहे, जेवढं श्वास घेणं आणि जेवण करणं. धावपळीच्या जीवनात थकवा जास्त जाणवतो.  त्यामुळे शरीर ताजतवाणं ठेवणं गरजेचं आहे. हे केवळ चांगली झोप घेतल्यानेच शक्य होतं. तुम्हाला जर झोपेत थंडी वाजत असेल तर तुमची झोपही पूर्ण होत नाही. पण झोपेत थंडी वाजण्याची काही कारणे तुम्हाला माहीत असायला हवीत. चला जाणून घेऊ काही कारणे...

अनेकदा लोकांना ही समस्या कळून येत नाही, पण थंडीच्या दिवसात लवकर कळून येते. काही लोकांना उन्हाळ्यातही झोपेत थंडी वाजू लागते. अचानक थंडी वाजणे साधारण बाब नाहीये. तुमची झोप अचानक उघडते आणि तुम्हाला थंडी वाजू लागत असेल तर यामागे अनेक कारणे असू शकतात. रात्री झोपेत थंडी वाजणे म्हणजे शरीरात काहीना काही समस्या आहे. 

तुमचं वजन

जर तुम्ही अंडरवेट असाल म्हणजे तुमचं वजन सामान्यापेक्षा कमी असेल तर अर्थातच तुमच्या शरीरात जास्त चरबी नसते. चरबीमुळे शरीरात गरमीची निर्मिती होते. रात्री तसंही झोपतेवेळी शरीराचं तापमान कमी होतं. शरीराचं टेम्प्रेचर गरम ठेवण्यासाठी काही इन्सुलेशनची गरज असते. 

जर तुम्ही योग्य प्रमाणात आहार घेतला नाही तर तुमचा मेटाबॉलिज्म दर कमी होईल. ज्यामुळे तुमचं शरीर योग्य प्रमाणात ऊर्जा निर्माण करू शकणार नाही आणि तुमच्या शरीरात गरमी निर्माण होणार नाही. त्यासोबतच जर तुमचं वजन जास्त असेल तर तुम्हाला पोटाच्या आजूबाजूला गरमी लागेल. पण हाता-पायांपर्यंत ही गरमी पोहोचू शकत नाही. यामुळे प्रयत्न करा की, वजन नियंत्रित ठेवाल.

झोप पूर्ण न झाल्यामुळे

ऐकायला हे थोडं विचित्र वाटतं, पण शरीरात गरमी तयार न होण्याचं हेही एक कारण आहे. पुरेशा प्रमाणात झोप होत नसल्याने मेटाबॉलिज्म सुद्धा गरमी निर्माण करू शकत नाही.

आयर्नची कमतरता

शरीराला व्यवस्थित चालवण्यासाठी शरीरात आयर्नचं प्रमाण भरपूर असणं गरजेचं आहे. हे शरीरातील लाल पेशींद्वारे शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्यात मदत करतात. सोबतच शरीरातील प्रत्येक पेशीने काम करावं ही सुद्धा आयर्नची जबाबदारी आहे. जर तुमच्या शरीरात आयर्नची कमतरता असेल तर तुम्हाला झोपेत थंडी वाजेल.

ब्लड सर्कुलेशनची समस्या

जर तुमचे हात-पाय नेहमी थंडे राहत असतील तर याने तुमच्यातील रक्तप्रवाहाची कमतरता दिसून येते. असंही होऊ शकतं की, तुम्हाला शरीराच्या एका भागात थंड वाटत असावं. हा हृदयरोगाचा संकेतही असू शकतो.

महिलांना होते अधिक समस्या

तुम्हाला ही बाब हैराण करू शकते. पण अनेक रिसर्चमधून हे स्पष्ट झालं आहे की, महिलांना पुरूषांच्या तुलनेत जास्त थंडी वाजते. सरासरी एका महिलेला पुरूषाच्या तुलनेत ३ डिग्री सेल्सिअस कमी तापमान जाणवतं. 

कसा कराल बचाव

जर तुम्हाला झोपेत नेहमीच थंडी वाजत असेल, तर नेमक्या कारणांचा शोध घ्या. ही समस्या असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांशी संपर्क करा. कारण या आजाराने तुमच्यात कमजोरी येऊ शकते. कमजोर शरीराल थंडी जास्त लागते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य