शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

चिंतेत भर! कोरोनाचा आणखी एक व्हेरिएंट आढळला; डेल्टापेक्षाही घातक? WHOचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 15:36 IST

आजही संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत आहे आणि हा विषाणू जगातून संपण्याऐवजी अधिकच घातक होताना दिसत आहे...

जगात कोरोना व्हायरस समोर येऊन 1.5 वर्षांपेक्षाही अधिक काळ झाला आहे. आजही संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत आहे. मात्र, तरीही हा विषाणू जगातून संपण्याऐवजी अधिकच घातक होताना दिसत आहे. कारण सातत्याने या व्हायरसचे नवनवे व्हेरिएंट्स समोर येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आता आणखी एका नव्या कोरणा व्हेरिएंटवर लक्ष केंद्रित केले आहे. Mu नावाचा B.1.621 हा व्हेरिएंट पहिल्यांदा या वर्षी जानेवारी महिन्यात समोर आला. या व्हेरिएंटशी संबंधित चार हजार रुग्ण 40 हून अधिक देशांमध्ये समोर आले आहेत.

म्यू व्हेरिएंटसंदर्भात चिंतेची बाब म्हणजे, डब्ल्यूएचओने म्हटल्यानुसार, हा व्हेरिएंट लसीलाही प्रभावहीन करू शकतो. डब्ल्यूएचओच्या मते या व्हेरिएन्टची तीव्रता समजून घेण्यासाठी अधिक अभ्यासाची गरज आहे. याला डब्ल्यूएचओने 'व्हेरिएंट ऑफ इंट्रेस्ट' असे म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, हा व्हेरिएंट जानेवारी 2021 मध्ये कोलंबियात आढळून आला. या दरम्यान, म्यू व्हेरिएंटचे काही रुग्ण समोर आले. यानंतर पाहता पाहता हा व्हेरिएंट दक्षिण अमेरिका आणि युरोपातील देशांव्यतिरिक्त इतर देशांमध्येही पोहोचला. जागतिक पातळीवर, या व्हेरिएंटने बाधित रुग्णांत कमी आली आहे आणि जागतिक स्तरावर हे प्रमाण 0.1 टक्क्याहून कमी आहे. 

Corona Updates: देशातील कोरोना संकट पुन्हा वाढलं, कालच्या तुलनेत आज तब्बल 12 टक्क्यांनी वाढली रुग्ण संख्या

म्यू व्हेरिएंट किती घातक? -डेल्टा व्हेरिएंटसह, म्यू व्हेरिएंटवरही नजर ठेवली जाईल. डब्ल्यूएचओने डेल्टा व्हेरिएंट शिवाय, अल्फा, बीटा आणि गॅमाला 'व्हेरिएंट ऑफ कन्सर्न' म्हणून सूचीबद्ध केले आहे. तर, म्यू शिवाय, इओटा, कापा आणि लॅम्बडा यांना 'व्हेरिएंट ऑफ इंट्रेस्ट' म्हटले आहे. म्यू फार संसर्गजन्य असल्यासंदर्भात, कोणतीही माहिती सध्या उपलब्ध झालेली नाही. याचे एक मुख्य म्यूटेशन E484K आहे, जो याला बीटा आणि गॅमा प्रमाणे अँटीबॉडीशी लढण्यास मदत करतो. यात N501Y म्यूटेशनही आहे. हे  त्याला अधिक संक्रमक बनवते. यात अल्फा व्हेरिएंट देखील आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाAmericaअमेरिका