शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

वजन कमी करण्यासाठी कोणत्या वेळी एक्सरसाइज करणं जास्त फायदेशीर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 12:46 IST

Weight loss Tips : अनेकजण ऑफिसमधून परतल्यावर जिमला जातात. मात्र, असं करून त्यांचं वजन कमी होत नसल्याची ते तक्रार करतात.

Weight loss Tips : वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांच्या मनात नेहमीच वेगवेगळे प्रश्न असतात. त्यातील एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्या वेळी एक्सरसाइज केल्याने वजन कमी होतं? अनेकजण ऑफिसमधून परतल्यावर जिमला जातात. मात्र, असं करून त्यांचं वजन कमी होत नसल्याची ते तक्रार करतात. अशात एक्सरसाइजच्या वेळेबाबत एका रिसर्चमधून खुलासा करण्यात आला आहे.

या रिसर्चनुसार, सकाळी एक्सरसाइज करणाऱ्यांचं वजन अधिक कमी होतं. जर तुम्ही दिवसाच्या इतर वेळी जेवढी एक्सरसाइज करता, तेवढीच इतर व्यक्ती सकाळी करत असेल तर त्या व्यक्तीला वजन कमी करण्यास अधिक फायदा होतो.

या रिसर्चमधून हे समजून घेण्यास मदत मिळाली की, काही लोकांचं नियमित एक्सरसाइज करूनही हवं तसं वजन कमी का होत नाही. या रिसर्चमध्ये साधारण १०० ओव्हरवेट लोकांचा समावेश करण्यात आला. हे लोक याआधी कोणत्याही प्रकारची एक्सरसाइज करत नव्हते. या सगळ्यांना आठवड्यातून ५ वेळा एका लॅबमध्ये येऊन एक्सरसाइज करण्यास सांगण्यात आले. त्यांना ६०० कॅलरी बर्न करेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या एक्सरसाइज करायच्या होत्या.

साधारण १० महिन्यांनंतर सर्वच सहभागी लोकांचं वजन कमी झालं, पण यात फार फरक होता. जेव्हा अभ्यासकांनी याचं कारण समजलं नाही तेव्हा त्यांनी लोकांच्या एक्सरसाइजच्या वेळेवर लक्ष दिलं. सर्वच सहभागी लोक सकाळी ७ वाजेपासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कधीही एक्सरसाइजसाठी येऊ शकत होते. अशात असं आढळलं की, जे लोक दुपारी एक्सरसाइज करत होते, त्यांचं वजन सकाळी एक्सरसाइज करणाऱ्यांपेक्षा कमी घटलं होतं. 

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य