AC मुळे आपल्याला कोणत्या समस्या होतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 02:56 PM2018-04-04T14:56:43+5:302018-04-04T14:56:43+5:30

AC आपल्या शरीरासाठी किती हानीकारक आहे ? AC च्या सवयीमुळे आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या समस्या आणि आजार निर्माण होतात.

What problems do you face due to AC? | AC मुळे आपल्याला कोणत्या समस्या होतात?

AC मुळे आपल्याला कोणत्या समस्या होतात?

googlenewsNext

अलिकडे गरमीपासून सुटका मिळवण्यासाठी AC चा वापर वाढला आहे. अनेकांच्या घरीही AC आणि ऑफिसमध्येही AC. लोकांना AC ची इतकी सवय झाली आहे की, प्रवास करायचा म्हटला तरी AC बस किंवा कॅब वापरली जाते. मात्र काय तुम्हाला माहिती आहे की, AC आपल्या शरीरासाठी किती हानीकारक आहे ? AC च्या सवयीमुळे आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या समस्या आणि आजार निर्माण होतात.

AC मुळे सर्वात मोठी होते समस्या होते ती आपल्या शरीराला स्वच्छ हवा न मिळणे. AC ऑन करायच्याआधी आपण खिडक्या-दरवाजे बंद करतो. या कारणाने रूममध्ये तेवढ्याच एरियात हवा बंद होते. ज्यामुळे आपल्या शरीराला स्वच्छ हवा मिळत नाही आणि आपल्या शरीराचा विकास होण्यास याचा अडसर होतो.

AC मध्ये झोपताना आपण अनेकदा रूममधील तापमान अधिक थंड करतो. आपलं शरीर एका क्षमतेपर्यंतच थंडी सहन करू शकतं. झोपताना एक अशी वेळ येते, जेव्हा आपलं शरीर खूप थंड होतं आणि आपल्याला माहितीही पडत नाही. या थंडीमुळे आपल्याला शरीरातील हाडांच्या समस्या सुरू होतात.

आपण जसाही AC ऑन करतो त्याच्या थंडाव्यामुळे आपला घाम सुकून जातो. मात्र, AC रूमसोबत सोबत शरीरातील गरमीही ओढून घेतो. शरीरातील उष्णता कमी झाल्याने शरीरातील पाणी कमी होतं. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. तसेच वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. त्वचेचे अनेक रोग आपल्याला जाळ्यात घेतात.

AC मुळे आपल्याला काही फायदे नक्कीच होतात, पण याचे नुकसानही जास्त आहेत. आपण आराम मिळावा म्हणून अशाप्रकारे यात गुंतत जातो की, आरोग्याकडे लक्ष देत नाही. याचं नुकसान आपल्याला मोठी किंमत चुकवून द्यावी लागते. AC चा वापर फारच काळजीपूर्वक करायला पाहिजे.

Web Title: What problems do you face due to AC?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.