डॉक्टरच्या चिठ्ठीवरील ‘Rx’ चा अर्थ काय आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2017 15:13 IST2017-05-28T09:43:48+5:302017-05-28T15:13:48+5:30
डॉक्टर प्रिस्किप्शनवर Rx का लिहितात, हे बऱ्याचजणांना माहित नाही. विशेष म्हणजे काही डॉक्टरांदेखील याचा अर्थ माहित नसतो. चला जाणून घेऊया याचा अर्थ.
.jpg)
डॉक्टरच्या चिठ्ठीवरील ‘Rx’ चा अर्थ काय आहे?
आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा आपणास उपचारासाठी डॉक्टरांकडे जावे लागते. डॉक्टर तपासणी केल्यानंतर एका कागदावर गोळ्या औषधांची नावे लिहून देतात म्हणजे प्रिस्किप्शनही देतात. याच प्रिस्किप्शनवर डॉक्टर Rx असेही लिहितात. या प्रिस्किप्शनवर कुठले औषध लिहिले आहे हे मेडिकल स्टोअर्स वाल्यांशिवाय इतरांना कळत नाही.
डॉक्टर प्रिस्किप्शनवर Rx का लिहितात, हे बऱ्याचजणांना माहित नाही. चला जाणून घेऊया याचा अर्थ.
Rx हे लॅटीन भाषेमधील एक चिन्ह आहे. इंग्रजीमध्ये ज्याचा अर्थ Take होतो. म्हणजेच याचा अर्थ ‘घेणे’ असा होतो. विशेष म्हणजे काही डॉक्टरांदेखील याचा अर्थ माहित नसतो. मिळालेल्या माहितीनुसार, इजिप्तचे चिकित्सा क्षेत्रात मोठे योगदान राहीले आहे. होरस हि इजिप्त या देशाची एक देवता आहे. Rx सारखे होरस या देवताचे डोळे दिसतात. देवताची डोळे स्वास्थ जिवनाचे प्रतिक मानले जात असल्यामुळेच डॉक्टर आपल्या प्रिस्किप्शनवर Rx असे लिहितात. पण अनेकांना याच्याबद्दल माहिती नाही.
इजिप्त देशामध्ये औषधांच्या रुपात गोळ्या घेतल्या जात असत. त्यावेळी ८व्या शतकात पहिला दवाखाना बगदादमध्ये सुरु झाला होता. तर, अमेरिकेत पहिला दवाखाना १७व्या शतकात सुरु झाला होता. १८२१मध्ये अमेरिकेत जगातील पहिले फार्मसी कॉलेज सुरु झाले होते.